कॉर्पोरेटसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 16, 2015 04:55 IST2015-05-16T04:55:16+5:302015-05-16T04:55:16+5:30
मोदी सरकारने भांडवलवाद्यांसाठी(कॉर्पोरेट) शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष

कॉर्पोरेटसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न
आदिलाबाद(तेलंगणा): मोदी सरकारने भांडवलवाद्यांसाठी(कॉर्पोरेट) शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी तेलंगणातील पदयात्रेदरम्यान जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिली, सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवत काहीही दिलेले नाही, असे ते म्हणाले. चंद्रशेखर राव यांना ‘मिनी मोदी’ असे संबोधत त्यांनी एकाच फटक्यात दोन्ही नेत्यांना लक्ष्य बनविले.