शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Kerala Floods: केरळच्या पुरात अडकलेल्या हत्तीच्या पिलाला जवानाने खांद्यावर उचललं?... हे आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:07 IST

केरळमध्ये पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या माणसांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातायत.

तिरुअनंतपूरम- केरळमध्ये पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या माणसांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातायत. परंतु या पुराच्या पाण्यात मनुष्यच नव्हे, तर पशू-पक्षीही अडकून पडले आहेत. काही दिवसांपूर्वी एका हत्तीच्या पिलाला एका जवानानं वाचवल्याचा फोटोही व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्या जवानानं हत्तीच्या पिलाला पुराच्या पाण्यातून वाचवण्यासाठी खांद्यावर घेतलं होतं आणि त्याचा जीव वाचवला होता.विशेष म्हणजे काही वृत्तपत्रांनीही या हत्तीचा फोटो छापला आहे. परंतु या फोटोचं सत्य काही तरी वेगळं आहे. खरंतर हा फोटो केरळचा नसून तामिळनाडूतला आहे. 2017मधल्या ऊटी हिल स्टेशनचा आहे. ऊटी हिल स्टेशनपासून 50 किलोमीटर दूरवर मेट्टुपालयम येथे हत्तीच्या पिल्लाची आईशी चुकामूक झाल्यामुळे ते दरीत पडलं. त्याच दरम्यान वनाधिकारी पलानीस्वामी सरथकुमार कामावर हजर झाले. तेव्हा त्यांना एकानं सांगितलं की, वानभद्र कालियाम्मन मंदिराजवळ एका हत्तिणीनं रस्त्यावर धुमाकूळ घातला आहे.जेव्हा सरथकुमार यांनी हत्तिणीला फटाक्यांच्या आवाजानं पळवून लावलं, त्यावेळी त्यांना शंका आली की अजूनही इथे कुठला तरी हत्ती अडकलेला असेल. त्यामुळे त्यांनी पूर्ण परिसराची टेहळणी केली. त्यावेळी त्यांना हे हत्तीचं पिल्लू दरीत अडकलेल्या अवस्थेत पाहायला मिळालं. त्यानंतर त्या पिल्लाला दरीतून बाहेर काढून त्यांनी हत्तिणीच्या स्वाधीन केलं.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरViral Photosव्हायरल फोटोज्Keralaकेरळ