एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक, आर.बी. गोयनका
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:19+5:302015-02-13T00:38:19+5:30

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक, आर.बी. गोयनका
>एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक, आर.बी. गोयनका नागपूर : कॉपार्ेरेट क्षेत्रातील वावर आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले विश्वास वसंतराव पाठक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आर.बी. गोयनका यांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनीच्या (एमएसईबी होल्डिंग कंपनी) संचालकपदी राज्य शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधात गुरुवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विश्वास पाठक हे गेल्या चार वर्षांपासून तरुण भारतचे प्रबंध संचालक आहेत. पाठक हे एमआरओ या एव्हिएशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. औद्योगिक बॉयलर निर्मिती कंपनीचेही त्यांनी नेतृत्त्व केले आहे. त्याचप्रमाणे ऊर्जा व साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. आर.बी. गोयनका हे उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. विदर्भ पर्यावरण कृती समितीचे ते संयोजक आहेत. व्हीएनआयटीचे ते माजी विद्यार्थी आहेत.