कसल्याही आव्हानांना तोंड देणारी ट्रम्प यांची बिस्ट कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 02:32 AM2020-02-23T02:32:49+5:302020-02-23T02:33:04+5:30

बिस्ट गाडीचा पत्रा हा पाच इंच जाडीचा असून तो अ‍ॅल्युमिनिअम, टिटॅनियम, सिरॅमिक व स्टिल यांच्या मिश्रणाने बनला आहे.

Trump's Beast Car Faces Any Challenge | कसल्याही आव्हानांना तोंड देणारी ट्रम्प यांची बिस्ट कार

कसल्याही आव्हानांना तोंड देणारी ट्रम्प यांची बिस्ट कार

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगात कुठेही दौऱ्यावर गेले तरी तिथे प्रवास करतात ते बिस्ट नावाने ओळखल्या जाणाºया लिमोझिन गाडीने. या गाडीचे मॉडेल २०१८ सालचे आहे. भारतातही ते याच गाडीने काही ठिकाणी प्रवास करणार आहेत.

या बिस्ट गाडीचा पत्रा हा पाच इंच जाडीचा असून तो अ‍ॅल्युमिनिअम, टिटॅनियम, सिरॅमिक व स्टिल यांच्या मिश्रणाने बनला आहे. बॉम्बहल्ल्यापासून या गाडीचे फारसे नुकसान होत नाही व आतील माणसेही सुरक्षित राहातात. या गाडीच्या दरवाजांची जाडी ८ इंच असते. एकदा हे दरवाजे बंद केले आतील माणूस एकदम सुरक्षित असतो. खिडक्यांच्या काचा पाच स्तरीय असून त्या पॉलिकार्बोनेट असतात. ही गाडी संपूर्णपणे बुलेटप्रुफ व बॉम्बरोधकही आहे. काचांपैकी चालकाच्या उजव्या हाताच्या बाजूच्या खिडकीची फक्त उघडते. तीही फक्त ३ इंच. या गाडीचे टायर पंक्चर झाले तरी त्यात असे तंत्रज्ञान वापरले आहे की, गाडी एका जागी न थांबता पुढे धावत राहिल. या कारमध्ये राष्ट्राध्यक्ष व अन्य चार जण बसू शकतात. बिस्ट नावाने ओळखल्या जाणाºया लिमोझिनमध्ये जीपीएस, टीअर गँस कॅनन, टिअर गॅस, अग्निशमन यंत्रणा, स्मोक स्क्रीन डिस्पेन्सर अशा अनेक सुविधा आहेत. आत ड्रायव्हरची केबिन तसेच राष्ट्राध्यक्षांचीही वेगळी केबिन व हाताशी पॅनिक बटणही, सॅटेलाईट फोनही असतोे. ही कार म्हणजे रणगाडाच असल्याचेही म्हटले जाते.

अद्ययावत एअर फोर्स वन विमान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दौऱ्यांसाठी एअर फोर्स वन नावाचे जे विमान वापरतात त्यात दोन किचन, एक मेडिकल आॅपरेटिंग रुम, डॉक्टरसहित एक आॅपरेशन थिएटर अशा सुविधा त्यात आहेत. या विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्याचीही सोय आहे. ते जम्बो जेट विमान असले तरी त्यात फक्त ७० जण प्रवास करू शकतात. या विमानात ८५ फोन लाईन्स व १९ टेलिव्हिजन आहेत. कोणत्याही हल्ल्यापासून वाचण्यासाठी या विमानामध्ये विशेष यंत्रणा आहे.

Web Title: Trump's Beast Car Faces Any Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.