भूसंपादन वटहुकमाविरुद्ध काँग्रेस फुंकणार रणशिंग

By Admin | Updated: January 4, 2015 01:45 IST2015-01-04T01:45:06+5:302015-01-04T01:45:06+5:30

मोदी सरकारने काढलेल्या भूसंपादन वटहुकमाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची तयारी चालविली असून त्याबाबत विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सोमवारी पक्षसरचिटणीसांची बैठक बोलावली आहे.

The trumpet to blow up the Congress against land acquisition ordinance | भूसंपादन वटहुकमाविरुद्ध काँग्रेस फुंकणार रणशिंग

भूसंपादन वटहुकमाविरुद्ध काँग्रेस फुंकणार रणशिंग

नवीन सिन्हा - नवी दिल्ली
मोदी सरकारने काढलेल्या भूसंपादन वटहुकमाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाची तयारी चालविली असून त्याबाबत विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सोमवारी पक्षसरचिटणीसांची बैठक बोलावली आहे.
हा वटहुकूम केवळ शेतकरीविरोधीच नव्हे तर संपूर्ण जनतेच्या विरोधात आहे. त्यातून सध्याच्या सरकारची मानसिकता दिसून येते, असे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केले. नव्या भूसंपादन कायद्याला तसेच त्यातील सर्व सुधारणांना विरोध करण्यासाठी या बैठकीत दीर्घकालीन योजनेवर चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. हे वटहुकूम जनविरोधी आणि हुकूमशाहीचे द्योतक असून या वटहुकूमाची गरज पटवून देताना दोन मंत्र्यांनी घेतलेली भूमिकाही गरीबविरोधी आहे. जमीन मालकांच्या पुनर्वसनासंबंधी सर्व जाचक तरतुदी हटवाव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. यापूर्वी संपुआ सरकारने संसदेत आणलेल्या भूसंपादन विधेयकाला भाजपने समर्थन दिले असताना या पक्षाने आता त्यात अयोग्य सुधारणा घडवून आणल्या आहेत.
उपाध्यक्षपदाची निवडणूक नाही...
प्रत्येक पदासाठी निवडणूक घेण्याची आवश्यकता नाही. नावावर सहमती होणे हाही निवडणुकीचा भाग आहे. काँग्रेसचे उपाध्यक्षपद निर्माण करण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने(सीडब्ल्यूसी) घेतला होता. पक्षघटनेनुसार त्यावर जयपूर येथील अधिवेशनात अ.भा. काँग्रेस समितीने शिक्कामोर्तब केले होते. या पदासाठी निवडणूक घेण्याची गरज नाही. राहुल गांधी यांच्या पदासाठी निवडणूक घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

च्काँग्रेसने संघटनात्मक निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. दिल्लीच्या निवडणुकांमुळे सदस्यत्व नोंदणी मोहिमेला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
च्संघटनात्मक निवडणुका लांबणीवर पडणे ही सर्वसाधारण प्रक्रिया असून पक्षाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून नव्याने तारखा घोषित केल्या जातील, अशी माहिती द्विवेदी यांनी दिली.

Web Title: The trumpet to blow up the Congress against land acquisition ordinance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.