ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार म्हसावदजवळील घटना : खड्डा चुकवताना झाला अपघात

By Admin | Updated: September 28, 2016 22:40 IST2016-09-28T22:40:46+5:302016-09-28T22:40:46+5:30

जळगाव: रस्त्यावरील खड्डा चुकवून ओव्हरटेक करताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने शामलाल लालचंद गाढरी (वय २८ रा.वावडदा, ता.जळगाव मूळ रा.बरडोल, जि.भिलवाडा, राजस्थान) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजता म्हसावद येथे रेल्वे गेटजवळ घडली. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

Trucker killed in road accident near Mhasawad | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार म्हसावदजवळील घटना : खड्डा चुकवताना झाला अपघात

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार म्हसावदजवळील घटना : खड्डा चुकवताना झाला अपघात

गाव: रस्त्यावरील खड्डा चुकवून ओव्हरटेक करताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने शामलाल लालचंद गाढरी (वय २८ रा.वावडदा, ता.जळगाव मूळ रा.बरडोल, जि.भिलवाडा, राजस्थान) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजता म्हसावद येथे रेल्वे गेटजवळ घडली. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शामलाल गाढरी व त्याचे सात ते आठ सहकारी राजस्थानातून विहीरींमध्ये ब्लास्टींग व्यवसायासाठी चार ते पाच वर्षापासून वावडदा येथे वास्तव्याला आहेत. म्हसावद शिवारात ब्लास्टिंगचे काम सुरु असल्याने शामलाल हा दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.बी.७०२३) कामावर जात असताना रेल्वेगेट नजीक असलेला खड्डा वाचविताना रस्त्यावर आदळला, त्यात मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र.जी.जे.०४ एक्स ५८९७) त्याला जोरदार धडक दिली. डोक्याला मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. या अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. त्यात मिळालेल्या परवान्यावरुन त्याचे नाव मेहबूब इब्राहीम जुनेजा (रा.फकीर शेरी, ता.वल्लभीपुरा, जि.भावनगर, गुजरात) असे असल्याचे निष्पन्न झाले.
मृतदेह नेला राजस्थानात
अपघाताची माहिती मिळताच म्हसावद दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल सुशील मगरे यांनी घटनास्थळ गाठले. रिक्षातून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह त्याच्या मुळ गावी नेला. शामलाल हा विवाहित असून त्याला मूलबाळ नाही. प्रकाश अमरचंद पुर्बिया (रा.माहेश्वरी मोहल्ला,बरडोद ता.अमीरगढ जि.भिलवाडा) याच्या फिर्यादीवरुन ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी तपास करीत आहेत.
फोटो..

Web Title: Trucker killed in road accident near Mhasawad