शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 15:42 IST

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Accident on Delhi-Mumbai Expressway : राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर रविवारी(दि.4) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिली, यानंतर ट्रक चालकाने गाडी थांबवण्याऐवजी कारला 1KM फरफटत नेले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील विक्रमगड अलोटचे रहिवासी असलेले कुटुंब ऋषिकेशवरुन आपल्या गावी परतत होते. या दरम्यान, त्यांची भरधाव कार सवाई माधोपूर जिल्ह्यातील सुरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनास नदीच्या पुलावर दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुढे जाणाऱ्या ट्रकला दोराने धडकली. 

ट्रक चालकाने कार एक किलोमीटरपर्यंत खेचलीअपघातानंतरही ट्रकचालकाने कार सुमारे एक किलोमीटरपर्यंत खेचली. यानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांचे मृतदेह अडकले होते. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अपघाताचे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. 

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. चारही मृतांचे मृतदेह सवाई माधोपूर जिल्हा मुख्यालयाच्या सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. मृतांमध्ये राजन, मोनिका, रेखा आणि धापू प्रजापत यांचा समावेश आहे. याशिवाय जखमींमध्ये पायल प्रजापत, बुलबुल प्रजापत, ज्योती प्रजापत, कृष्णा प्रजापत आणि कार चालक शकील खानसह लहान मुलगी अनिता यांचा समावेश आहे. चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईdelhiदिल्ली