ट्रक व टिप्परची धडक

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:11+5:302015-09-01T21:38:11+5:30

ट्रक व टिप्परची धडक

Truck and tips | ट्रक व टिप्परची धडक

ट्रक व टिप्परची धडक

रक व टिप्परची धडक
चालक ठार : उदासा शिवारातील अपघात
उमरेड : परस्पर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रक व टिप्परची जोरदार धउक झाली. यात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही वाहनांच्या चालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड-नागपूर महामार्गावरील उदासा शिवारात रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
श्रीकांत मोरेश्वर मेश्राम (३५, रा. सोनेझरी, ता. उमरेड) असे मृत ट्रकचालकाचे तर लोकेश हरीश नन्नावारे (२६, रा. नागपूर) असे मृत टिप्परचालकाचे नाव आहे. श्रीकांत हा एमएच-३१/सीबी-७५५३ क्रमांकाचा ट्रक घेऊन नागपूरहून उमरेडकडे येत होता तर त्याचवेळी लोकेश हा एमएच-३४/एम-४६९९ क्रमांकाचा टिप्पर घेऊन उमरेडहून नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, या उदासा शिवारात या दोन्ही भरधाव वाहनांची जोरदार धडक झाली. यात श्रीकांत व लोकेश गंभीर जखमी झाले. त्या दोघांनाही उमरेड पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहनाबाहेर काढून नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले. तिथे दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
***

Web Title: Truck and tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.