दिल्ली भाजपाच्या दारुण पराभवामागची त्रिसूत्री

By Admin | Updated: February 11, 2015 06:29 IST2015-02-11T06:29:53+5:302015-02-11T06:29:53+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे

Tripuri of Delhi BJP's demise campaign | दिल्ली भाजपाच्या दारुण पराभवामागची त्रिसूत्री

दिल्ली भाजपाच्या दारुण पराभवामागची त्रिसूत्री

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा पराभव आहे. पक्षासाठी सतत ४१ निवडणुका जिंकणाऱ्या शहा यांच्या रणनीतीत अशी कोणती चूक झाली की भाजपाला दिल्लीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला? यामागची काही प्रमुख प्राथमिक कारणे...

> प्रचारात विकासाकडे दुर्लक्ष
लोकसभेची निवडणूक आणि काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच भाजपा श्रेष्ठींनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही आक्रमक प्रचार मोहीम राबविली. पक्ष नेतृत्वाने अनेक दिग्गज नेत्यांसह पक्षाच्या १२० खासदारांची फौज प्रचारात उतरविली. सोशल मीडियासोबतच प्रिंट मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देऊन केजरीवाल यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. नकारात्मक प्रचार केला. त्यामुळे भाजपा लोकांना आपला विकासाचा अजेंडा समजावून सांगण्यात अपयशी ठरली. दिल्लीच्या सुशिक्षित व सभ्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्थानिक मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले नाहीत. या लोकांनी भाजपाचा हा नकारात्मक प्रचार नाकारला.


> मोदी लाटेचा फायदा नाही
निवडणुका उशिरा जाहीर झाल्यामुळे
प्रदेश भाजपाला मोदी लाटेचा फायदा
करून घेण्यात अपयश आले. दिल्लीत उशिराने निवडणुका जाहीर करणे हा भाजपाच्या विशेष रणनीतीचा भाग होता, असे सांगितले जाते. रा.स्व. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांना तयारी करण्याची पूर्ण संधी मिळावी हा त्यामागचा हेतू होता. परंतु स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला. शिवाय मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यातही विलंब झाला आणि शेवटी किरण बेदींचे नाव पुढे आल्याने भाजपात गटबाजी निर्माण झाली.

> व्हिजन डॉक्युमेंट अपयशी
भाजपाने आम आदमी पार्टीचे डावपेच
हाणून पाडण्यासाठी अगदी शेवटच्या
क्षणी आपले डावपेच बदलले आणि निवडणूक जाहीरनामा देण्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. त्यात दिल्लीच्या विकासासाठी एक रोडमॅप सादर करण्यात आला. व्हिजन डॉक्युमेंट जारी करण्यात विलंब झाल्याने हे व्हिजन डॉक्युमेंट नेमके
काय आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी वेळच मिळाला नाही. भाजपाने निवडणूक प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीला दररोज पाच प्रश्न विचारले. हे प्रश्न फारसे प्रभावी नसल्याने आणि त्यात नकारात्मकताच असल्याने ते लोकांच्या गळी उतरले नाहीत.

Web Title: Tripuri of Delhi BJP's demise campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.