शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

त्रिपुरात जमावाने लेनिन यांचा आणखी एक पुतळा पाडला, मार्क्सवाद्यांची कार्यालये व घरेही फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:58 IST

मार्क्सवाद्यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी त्रिपुरातील बेलोनिया शहरातील जागतिक कीर्तीचे महान कम्युनिस्ट नेते व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा जेसीबी मशीनच्या साह्याने पाडून टाकला तर या घटनेच्या दुस-याच दिवशी एका जमावाने सबरुम तालुक्यात लेनिन यांचा आखणी एक पुतळा पाडून टाकला आहे.

आगरतळा - मार्क्सवाद्यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी त्रिपुरातील बेलोनिया शहरातील जागतिक कीर्तीचे महान कम्युनिस्ट नेते व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा जेसीबी मशीनच्या साह्याने पाडून टाकला तर या घटनेच्या दुस-याच दिवशी एका जमावाने सबरुम तालुक्यात लेनिन यांचा आखणी एक पुतळा पाडून टाकला आहे. या घटनेनंतर राज्याच्या अनेक भागात हिंसाचार उसळला आहे. काही भागात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. अनेक ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कार्यालये तसेच कार्यकर्त्यांच्या घरांचीही तोडफोड करण्यात आली आहे.त्रिपुरातील माकपचे जिल्हा सचिव तापस दत्ता म्हणाले की, राज्यात बेलोनियामध्ये कॉलेज स्क्वेअरमध्ये असलेला लेनिन यांचा पुतळा भाजपा कार्यकर्त्यांनी पाडून टाकला. काही महिन्यांपूर्वीच पॉलिट ब्यूरोचे सदस्य प्रकाश करात यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा पाडल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणाही दिल्या. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंचक इप्पर यांनी सांगितले की, जेसीबी मशीनच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली. हा पुतळा महापालिकेने ताब्यात घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यपाल तथागत राय आणि डीजीपी ए. के. शुक्ला यांच्याशी चर्चा राज्यात उसळलेल्या हिंसाचाराबाबत चर्चा केली आहे. त्यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.भाजपाने केला उलटा आरोपमाकपमधून भाजपामध्ये आलेल्या अज्ञात लोकांनी हा हिंसाचार केला, असा दावा भाजपाचे उपाध्यक्ष सुबल भौमिक यांनी केला. माकप कार्यकर्त्यांनीच आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले, असा आरोपही त्यांनी केला.विदेशी नेत्यांच्या पुतळ्यांची भारतात गरज नाही : अहिरसर्व प्रकारच्या हिंसाचाराचा सरकार निषेध करत आहे. मात्र विदेशी नेत्यांच्या पुतळ्यांची भारतात मुळात गरजच नाही. भारतात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीन दयाल उपाध्याय व राम मनोहर लोहिया यांच्यासारखे बरेच थोर आदर्श आणि विचारवंत होऊन गेले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.माकप कार्यालये फोडलीमाकपची त्रिपुरातील १३४ कार्यालये फोडून आतील सामान लुटले आहे. ६४ कार्यालयांना आगी लावल्या आणि सुमारे ९0 संघटनांच्या कार्यालयांचा ताबा भाजपा व आयपीएफटीच्या कार्यकर्त्यांनी घेतला, असे माकपचे नेते बिजन धर यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या ५१४ कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, कार्यकर्त्यांच्या १५३९ घरांची नासधूस तर १९६ कार्यकर्त्यांच्या घरांना आगी लावल्या आहेत. हिंसाचारानंतर श्रीनगर, लेफुंगाख, मंडई, आमतली, मोहनपूरसह दक्षिण त्रिपुरात काही भागात प्रतिबंधक आदेश लागू केले आहेत.तामिळनाडूत पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोडभाजपाचे चिटणीस एच. राजा आणि भाजयुमो तमिळनाडू शाखेचे प्रमुख एस.जी. सूर्या यांनी लेनिनचा पुतळा पाडण्याचे स्वागत करताना, तामिळनाडूतील थोर समाजसुधारक ई.व्ही. रामस्वामी पेरियार यांचा ‘जातीय राजकारणाचे शिरोमणी’ असा उल्लेख करून त्यांचेही पुतळे पाडले जायला हवेत, असे सूचित केल्यानंतर काही तासांतच वेल्लूर येथील पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. हा पुतळा तिरुपत्तूर महापालिकेच्या कार्यालयात होता़ याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यासह दोघांना अटक केली आहे़ दोघेही दारूच्या नशेत होते असे समजते़ यावरून द्रविडी पक्ष आणि दलितांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राजा यांना अटकेची मागणी द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केली. दलित नेते थोल तिरुमवलवन यांनी राजा यांना सत्तेची मस्ती चढल्याचा आरोप केला. हा वाद अंगलट येत असल्याचे दिसताच स्वत: एच. राजा यांनी टिष्ट्वट मागे घेतले व ते त्यांचे व्यक्तिगत मत होते, असे सांगत तमिळनाडू भाजपा अध्यक्ष तमिलीसाई सुंदरराजन यांनी वादातून पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला़

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या