शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनो, ड्युटीवर असताना जिन्स, गॉगल वापरु नका; राज्य सरकारच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 09:24 IST

सरकारच्या आदेशावर काँग्रेसची जोरदार टीका

नवी दिल्ली: त्रिपुरातील सत्ताधारी भाजपासरकारनं अधिकाऱ्यांना कपड्यांबद्दल महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. याबद्दल राज्य सरकारकडून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असताना जिन्स, डेनिम वेअर आणि सनग्लासेस वापरु नयेत, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. सरकारच्या या आदेशावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. मुख्य सचिव सुशील कुमार यांनी अधिकाऱ्यांच्या ड्रेस कोडबद्दल एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. राज्यातील अधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान ड्रेस कोडचं पालन करावं, अशा सूचना यामधून देण्यात आल्या आहेत. 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सचिव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांमध्ये अधिकाऱ्यांनी ड्रेस कोडचं पालन करावं,' असं मुख्य सचिवांनी परिपत्रकात म्हटलं आहे. 20 ऑगस्टला या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्याला 30 वर्ष भारत सरकारच्या सेवेचा अनुभव आहे. या कार्यकाळात आपण कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याला कॅज्युअल ड्रेसमध्ये कार्यालयात पाहिलेलं नाही, असंही कुमार यांनी परिपत्रकात म्हटलं आहे. 'काही अधिकारी बैठकीदरम्यान मोबाईलवर मेसेज वाचतात आणि मेसेज पाठवतात. यामुळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीचा अपमान होतो,' असंही परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तापस डे यांनी या आदेशावर जोरदार टीका केली आहे. सरकारचा हा आदेश सामंतशाही मानसिकतेचं प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडून अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Tripuraत्रिपुराBJPभाजपाGovernmentसरकार