पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसची सरशी तामिळनाडू, आंध्रात सत्ताधार्‍यांचा विजय

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:40+5:302015-02-16T21:12:40+5:30

नवी दिल्ली : शारदा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादविवाद गर्तेत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत बोनगाव लोकसभा आणि कृष्णगंज विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे़ या दोन्ही जागा सोमवारी तृणमूलने आपल्या खिशात टाकल्या़ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांतील पोटनिवडणुकीतही सत्ताधारी पक्षांनी बाजी मारली आहे़

Tripura Congress in West Bengal bypoll in Tamil Nadu, Andhra Pradesh victory | पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसची सरशी तामिळनाडू, आंध्रात सत्ताधार्‍यांचा विजय

पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसची सरशी तामिळनाडू, आंध्रात सत्ताधार्‍यांचा विजय

ी दिल्ली : शारदा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादविवाद गर्तेत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत बोनगाव लोकसभा आणि कृष्णगंज विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे़ या दोन्ही जागा सोमवारी तृणमूलने आपल्या खिशात टाकल्या़ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांतील पोटनिवडणुकीतही सत्ताधारी पक्षांनी बाजी मारली आहे़
शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांना सीबीआयने अटक केली आहे़ ------या पार्श्वभूमी----- बोनगाव लोकसभा आणि कृष्णगंज विधानसभा जागेसाठीच्या पोटनिवडणुकांकडे तृणमूलच्या लोकप्रियतेची लिट्मस टेस्ट म्हणून पाहिले गेले होते़ या चाचणीत तृणमूल अखेर यशस्वी ठरली़ गोव्यात सत्तारूढ भाजपने सहाव्यांदा पणजी विधानसभा जागेवर विजय नोंदवला़ माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची केंद्रात संरक्षण मंत्रिपदी वर्णी लागल्यावर ही जागा रिक्त झाली होती़

़़़़़़़़़़़़़़
अरुणाचलमध्ये काँग्रेसचा विजय
इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या प. सियांग जिल्ह्यातील लिरोंबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली़ पक्षाचे उमेदवार न्यामर करबाक यांनी आपल्या भाजप प्रतिस्पर्ध्याचा ११९ मतांनी पराभव केला़ या विजयासोबत राज्यातील ६० सदस्यीय विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या ४७ वर पोहोचली़
़़़़़़़़़़़़़़
आंध्र प्रदेशात तेदेपाचा विजय
हैदराबाद : सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत तेलगू देसम पार्टीचे उमेदवार एम़ सुगुना यांनी आंध्र प्रदेशच्या तिरुपती विधानसभेच्या जागेवर आपले नाव कोरले़ गतवर्षी डिसेंबरमध्ये सुगुना यांचे पती आणि तेदेपा आमदार एम़ व्यंकटरमन यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती़
़़़़़़़़़़़़़़

तामिळनाडूत अण्णाद्रमुक
तामिळनाडूच्या श्रीरंगम विधानसभा जागेवर सत्तारूढ अण्णाद्रमुकने बाजी मारली़ माजी मुख्यमंत्री जे़ जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती़

कोट
पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय चमत्कार आहे़ हा लोकांनी घडवून आणलेला चमत्कार आहे़ मां, माटी, मानुषला माझा सलाम़ दिल्लीचे षड्यंत्र, भाजपचा आणि मीडियाच्या एका वर्गाकडून झालेला खोटा प्रचार याविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे़
- ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस प्रमुख

Web Title: Tripura Congress in West Bengal bypoll in Tamil Nadu, Andhra Pradesh victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.