शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःचं घरही नसलेले माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आता कुठे राहतात माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 16:04 IST

माणिक सरकार यांनी आपली पिढीजात संपत्ती बहिणींना देऊन टाकली आहे.

आगरतळा- भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री ओळखले जाणारे माणिक सरकार सत्तेतून बाहेर गेल्यावर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये राहत आहेत. आगरतळा येथे पक्षकार्यालयावरती असणाऱ्या दोन खोल्यांच्या सदनिकेत माणिक सरकार आणि त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य राहत आहेत. त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदावरुन २० वर्षांनी पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे स्वतःचे घर नसल्यामुळे दोघांनाही पक्ष कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला आहे. आमदार निवासस्थानात राहण्यास सरकार यांनी नकार दिला आहे.माकपाच्या त्रिपुरा विभागाचे सचिव बिजन धर यांनी या कार्यालयामध्ये फारशा सोयी नसल्याचे सांगितले. आमच्या पक्षाच्या नेत्यांचे आयुष्य अत्यंत साधे असल्याचे सांगितले. माणिक सरकार यांनी आपली पिढीजात संपत्ती बहिणींना देऊन टाकली आहे आणि यापूर्वीही ते पक्षाच्या कार्यालयामध्ये राहिलेले आहेत. सरकार यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य यांची त्रिपुरामध्ये स्थावर मालमत्ता होती पण ती एका बांधकाम व्यावसायिकाला दिल्यावर वाद निर्माण झाला होता. या इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सर्व प्रकारच्या सरकारी सोयी मिळतील असे मत मुख्यमंत्री पदाचे दावेदार विप्लव देव यांनी व्यक्त केले असून विरोधी पक्षनेत्यासही कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा व भत्ते मिळतील आणि इतर आमदार एमएलए हॉस्टेलमध्ये राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.  माणिक सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्या त्रिपुराच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे असेही देव यांनी सांगितले.

टॅग्स :Manik Sarkarमाणिक सरकारTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018