शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अधिवेशनादरम्यान सभागृहात पाहिला पॉर्न व्हिडिओ; भाजप आमदारावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:34 IST

पॉर्न व्हिडिओ पाहताना भाजप आमदार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Tripura BJP: काही दिवसांपूर्वीच त्रिपुरा राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पक्ष (BJP) सत्तेत परतला. कम्युनिस्ट पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या या राज्यात भाजपने सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले. यातच आता त्रिपुरामधील एका भाजप आमदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना सभागृहात हा आमदार मोबाईलवर पॉर्न पाहत असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत. फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर यांनी व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ आज (30 मार्च) त्रिपुरा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यानचा आहे. त्रिपुराच्या बागबासा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार जादब लाल नाथ अधिवेशनादरम्यान आपल्या मोबाईलवर पॉर्न पाहताना दिसत आहेत. जादब लाल नाथ मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जादब लाल नाथ हे बागबासाचे आमदार सीपीएमच्या बलाढ्य बालेकिल्ल्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या बागबासा विधानसभा मतदारसंघात जादब लाल नाथ यांनी भाजपच्या विजयाचा झेंडा फडकवला होता. 2018 च्या निवडणुकीत भाजपला बागबासा विधानसभा जागा जिंकता आली नाही. 2018 च्या निवडणुकीत सीपीएमच्या बिजीता नाथ यांनी भाजपच्या प्रदीप कुमार नाथ यांचा 270 मतांनी पराभव केला. 2023 च्या निवडणुकीत भाजपने जादब लाल नाथ यांच्यावर बाजी लावली होती. नाथ यांनी सीपीएमच्या बिजीता नाथ यांचा 1400 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारTripuraत्रिपुरा