नवी दिल्ली: तिहेरी तलाक विधेयकावरील चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनीभाजपावर आणि मोदी सरकारवर टीका केली. ओवेसींच्या टीकेला भाजपाकडून खासदार पूनम महाजन यांनी उत्तर दिलं. तुमच्या कुटुंबातील एखाद्या महिलेला तिच्या पतीनं फोनवरुन तलाक दिला, तर त्याचं अभिनंदन कराल का, असा सवाल महाजन यांनी विचारला.तिहेरी तलाक विधेयक व्हॉट्स अॅप, फोन कॉलवरुन तलाक देणाऱ्यांविरोधात आहे. कारण जेवणात मीठ कमी पडलं म्हणूनही तलाक देणाऱ्या महिलांच्या व्यथा आम्ही जाणून आहोत, असं महाजन म्हणाल्या. इंग्रजीत पुरुषाला he आणि महिलेला she म्हणतात. त्या she चा अर्थ सुपीरियर टू ही (Superior to he) असा होता. तिहेरी तलाकविरोधातील याचिकेवर १० लाख महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही. हा आमचा न्यायासाठीचा लढा असून आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही', अशा शब्दांत महाजन यांनी ओवेसींनी प्रत्युत्तर दिलं.
VIDEO: ओवेसींना पूनम महाजनांची टक्कर, महिला सन्मानावर बोलल्या 'कट्टर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 20:53 IST