शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

लढाऊ विमान ‘सुखोई’तून सोडले आवाजाहून तिप्पट वेगवान ब्राह्मोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:55 AM

नवी दिल्ली : हवेत भरारी घेणा-या सुखोई ३०एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राम्होस या जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला.

नवी दिल्ली : हवेत भरारी घेणा-या सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राम्होस या जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला. जमीन, हवा आणि पाणी अशा तिन्ही ठिकाणांहून सोडता येऊ शकणारे ब्राह्मोस हे जगातील पहिले क्षेपणास्त्र ठरले असून त्याच्या या त्रिविध मारकशक्तीने देशाच्या युद्धसज्जतेस नवे बळ मिळणार आहे.ताशी ३,२०० किमीपर्यंतच्या वेगाने भरारी घेऊ शकणारे सुखोई लढाऊ विमान आणि त्यातून सोडले जाणारे आवाजाहून तिप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्र या संयोग अत्यंत भेदक ठरणारा आहे. यामुळे शत्रूप्रदेशात खूप आतपर्यंत पोहोचून लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या क्षमतेमुळे ब्राह्मोस हे आता भारतीय सैन्यदलांकडील ‘जीप सर्जिकल स्ट्राइक’ करू शकणारे क्षेपणास्त्र ठरणार आहे. याआधी या क्षेपणस्त्राच्या जमीन व जहाजावरून मारा करण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. आता ते हवेत भरारी घेणाºया लढाऊ विमानातूनही सोडणे शक्य होणार आहे. परिणामी भूदल, नौदल व हवाईदल या तिन्ही सैन्यदलांच्या शस्त्रभांडारातील ते एक मोलाचे अस्त्र ठरेल.बुधवारच्या या चाचणीसाठी हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमाने कोठून उड्डाण केले हे जाहीर करण्यात आले नाही. मात्र संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार हवेत इच्छित स्थळी पोहोचल्यावर सुखोई विमानाच्या पंखावर बसविलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र गुरुत्वीय बलाने खाली सोडण्यात आले. लगेच हे क्षेपणास्त्र आपला मार्ग स्वत: शोधत बंगालच्या उपसागरातील इच्छित लक्ष्याच्या दिशेने झेपावले व अल्पावधीतच त्याचे अचूक वेध घेत लक्ष्य उद््ध्वस्त केले.ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन २.५ टन आहे. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटाना (डीआरडीओ) व रशियाची ‘एनपीएमओ’ कंपनी यांनी संयुक्तपणे स्थापन केलेली कंपनी या क्षेपणास्त्राचे उत्पादन करते. या वर्गातील ते जगातील सर्वातवेगवान क्षेपणास्त्र आहे. ते लढाऊ विमानावर बसवून वाहून नेता यावे यासाठी हिंदुस्तान एयरोनॉटिक्सने (एचएएल) त्यात सुयोग्य बदल केले.>संरक्षणमंत्र्यांकडून अभिनंदनसंरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या यशाबद्दल ब्राह्मोस चमूच्या व डीआरडीओच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अभिनंदनाच्या टिष्ट्वटमध्ये त्यांनी लिहिले की, ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा जमीन, हवा व पाणी अशा तिन्ही पातळींवरून मारा करण्याची क्षमता आत्मसात करून भारताने जागतिक विक्रम केला आहे. लष्करी सज्जतेच्या दृष्टीने हा क्षण ऐतिहासिक आहे.>भारताने रशियाकडून २७२ सुखोई विमाने घेण्याचा १२ अब्ज डॉलरचा करार केला. त्यापैकी २४० सुखोई लढाऊ विमाने हवाई दलात दाखल झाली आहेत.आणखी अशाच चाचण्या करून त्या निर्धोकपणे यशस्वी झाल्यावर, एकूण ४२ सुखोई लढाऊ विमाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे बसवून सज्ज करण्याची हवाई दलाची योजना आहे.

टॅग्स :Indiaभारतindian air forceभारतीय हवाई दल