शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणाऱ फैसला, संपूर्ण देशाचे निकालाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 21:40 IST

गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. 

नवी दिल्ली, दि. 21  -  गेल्या काही काळापासून गाजत असलेल्या मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातून तिहेरी तलाक प्रकरणी येणाऱ्या निकालाकडे संपूर्णँ देशाचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वेच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ या प्रकरणी निर्णय सुनावणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता याबाबतचा निकाल सुनावण्यात येण्याची शक्यता आहे. तिहेरी तलाक प्रकरणी 11ते 18 मे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अधिक वाचा महिलांना ट्रिपल तलाक नाकारण्याचा हक्क मिळू शकतो का?ट्रिपल तलाक संपवण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढे यावं, मोदींचं आवाहनसंघर्षाने नव्हे, तर जागृतीने ट्रिपल तलाक बंद व्हावा - मोदीतिहेरी तलाकविषयी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना केंद्र सरकारने आपण तिहेरी तलाकच्या प्रथेला वैध मानत नसल्याचे सांगितले. तसेच सरकार ही कुप्रथा सुरू ठेवण्याच्या बाजूने नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.  याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मुस्लिमांमध्ये विवाहसंबंध संपविण्याची ‘तीन वेळा तलाक’ ही प्रथा विशिष्ट विचारसरणीच्या गटांच्या मते ‘कायदेशीर’ असली तरी प्रत्यक्षात ‘अत्यंत वाईट’ आणि ‘अनिष्ट’ आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने  व्यक्त केले होते. "तीन वेळा तलाक हा कायदेशीर आहे अशी विशिष्ट विचारसरणी आहे; परंतु ती विवाहसंबंध संपविण्याची अत्यंत वाईट आणि अनिष्ट प्रथा आहे, असे सरन्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले होते. यावेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को आणि सौदी अरेबिया या देशांत तीन वेळा तलाक म्हणून विवाहसंबंध संपविण्यास परवानगी नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.   11 ते 18 मे या काळात झालेल्या सुनावणीवेळी निकाहनामा म्हणजे मुस्लिमांच्या विवाहाच्यावेळी मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकला नकार देण्याचा पर्याय मिळू शकतो का ? असा सवाल पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विचारला होता. ट्रिपल तलाकला आव्हान देणा-या याचिकांवर न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे. ट्रिपल तलाकमध्ये मुस्लिमांना तीनवेळा तलाक, तलाक, तलाक बोलून वैवाहिक नाते संपवता येते. 

टॅग्स :IndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय