शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

तिहेरी तलाक विधेयक : असदुद्दीन ओवेसींच्या सूचना फेटाळल्या, म्हणाले विधेयक महिलांना न्याय देणारं नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 21:08 IST

तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त करत तिहेरी तलाक हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारे नाही, असे म्हटले आहे. 

ठळक मुद्देतिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर तिहेरी तलाक हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारे नाही - असदुद्दीन ओवेसीअसदुद्दीन ओवेसी यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या

नवी दिल्ली :  तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त करत तिहेरी तलाक हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारे नाही, असे म्हटले आहे. 

मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली तिहेरी तलाकची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणा-या प्रस्तावित कायद्याचे विधेयक गुरुवारी लोकसभेत मांडण्यात आले. त्यानंतर दिवसभर या विधेयकावर चर्चा झाली. तसेच, या विधेयकात काही दुरुस्त्या करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या. या दुरुस्त्यांवर लोकसभेत आवाजी मतदान घेण्यात आले. यावेळी या विधेयकासंबंधी सुचविलेल्या 20 दुरुस्त्या रद्द करण्यात आल्या, तर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सुद्धा फेटाळण्यात आल्या. असदुद्दीन ओवेसी यांच्या बाजूने अवघी दोन मतं पडली, तर त्याच्यांविरोधात 241 जणांनी मतदान केले. दरम्यान, तिहेरी विधेयक मंजूर झाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारे नाही, पण अधिक अन्याय करेल.    

 

कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मांडले. यावेळी त्यांनी मुस्लिम देशांमध्येही तिहेरी तलाकवर बंदी आहे. मग भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात तिहेरी तलाकवर बंदी का नको, असा सवाल केला. सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातल्यानंतरही देशात तिहेरी तलाकच्या 100 केसेस दाखल झाल्याचे समोर आले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. यावेळी त्यांनी तिहेरी तलाकवरील बंदीद्वारे केंद्र सरकार शरीया कायद्यात कोणताही हस्तक्षेप करत नाही, असे स्पष्टीकरण दिले. यावर मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, आमचा या विधेयकाला पाठिंबा आहे. पण, यामध्ये काही त्रुटी आहेत, यात सुधारणा करणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला पाहिजे. यावळी रविशंकर प्रसाद म्हणाले, मी काँग्रेसचा आभारी आहे. त्यांनी त्यांच्या सूचना सभागृहात मांडाव्यात, त्या उचित वाटल्यास आम्ही त्यानुसार विधेयकात सुधारणा करु, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्यास कोर्टाने सांगितले होते. कोर्टाच्या सूचनेनुसार आता केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गटाने हा मसुदा तयार केला आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांचा समावेश आहे. 

 

 

तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय ?- तिहेरी तलाक म्हणजेच तिहेरी तलाक. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो. - या पद्धतीमध्ये पुरुष तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो, फक्त या शब्दाच्या तीनदा उच्चारणाने घटस्फोट मिळतो. - वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणं अपेक्षीत आहे, मात्र बहुतांशवेळेस एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटलं जातं. - तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो.- आधुनिक काळात फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचाही वापर केल्याची उदाहरणे आहेत. - तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसरया पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते. मगच पहिल्या पतीशी पुन्हा विवाह करता येतो .- भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल  लाँ ( शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७ च्या अंतर्गत येतात. - तिहेरी तलाकला तलाक -ए- मुघलझा असेही म्हटले जाते. - तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे. - काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.

काय आहे नेमके प्रकरण?मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं.  मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं.त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.

तिहेरी तलाकविरोधातील याचिकासात याचिकाकर्त्या महिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी केली होती. मुस्लिम महिला आंदोलन, मुस्लिम वीमेन पर्सनल लॉ बोर्ड, लॉयर्स कलेक्टिव या संघटनांनीही तिहेरी तलाक रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. तिहेरी तलाकमुळे पुरूषांना लग्न मोडण्याचा एकतर्फी हक्क मिळतो. हे घटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते. गेल्या ७० वर्षांपासून आपण या सापळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे धर्म आणि घटना या दोन्हींना धक्का लागणार नाही, असा कायदा बनवण्याची गरज पक्षकारांकडून व्यक्त करण्यात आली होती.

या देशांनी झटपट घटस्फोट देण्याची प्रथा केली हद्दपार पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीParliamentसंसद