आरतीनगरमध्ये तिहेरी टक्कर - वॉर्ड- ३४

By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:32+5:302015-04-15T00:03:32+5:30

वॉर्ड क्रमांक - ३४

Triple collision in Aarti Nagar - Ward-34 | आरतीनगरमध्ये तिहेरी टक्कर - वॉर्ड- ३४

आरतीनगरमध्ये तिहेरी टक्कर - वॉर्ड- ३४

र्ड क्रमांक - ३४
आरतीनगरमध्ये तिहेरी टक्कर
औरंगाबाद : वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये सात महिला उमेदवार मनपा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापचकी भाजपच्या मोनिका नागेश भालेराव, बीएसपीच्या पूजा अनिल जाधव आणि एमआयएमच्या संगीता सुभाष वाघुले यांच्यात खरी टक्कर होणार आहे.
यंदा वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव सुटला आहे. येथील विद्यमान नगरसेवक काँग्रेसचे आनंद घोडेले हे आहेत. त्यांच्यापूर्वी अपक्ष शकुंतला जाधव, अपक्ष भगवान रगडे, सेनेचे महादेव सूर्यवंशी यांना मतदारांनी निवडून दिले होते. कधी पक्ष, तर कधी अपक्षांच्या बाजूने मतदारांचा कल राहिलेला आहे. वॉर्ड दलित आणि मुस्लिमबहुल असल्यामुळे एमआयएमने उमेदवार दिला आहे. यंदा येथून भाजपच्या मोनिका नागेश भालेराव, बहुजन समाज पार्टीच्या पूजा अनिल जाधव, काँग्रेसतर्फे रोहिणी संदीप लोखोले, राष्ट्रवादी काँगे्रसकडून सय्यद शबाना सय्यद नजिमोद्दीन, एमआयएमतर्फे संगीता सुभाष वाघुले, अपक्ष सईमुन्निसा पठाण, सविता अंकुश शिंदे या नशीब अजमावत आहेत.
गेल्या निवडणुकीमध्ये मिसरवाडी, आरतीनगर हा एक वॉर्ड होता. यंदा या वॉर्डाचे दोन वेगवेगळे वॉर्ड झाले आहेत. मिसरवाडी वॉर्ड क्रमांक ३३ आणि वॉर्ड क्रमांक ३४ आरतीनगर, असे दोन वॉर्ड झाले आहेत. आरतीनगर वॉर्डात मिसरवाडीचा काही भाग, अब्रार कॉलनी, भक्तीनगर या वसाहतींचा समावेश आहे. वॉर्डात मुस्लिम मतदार दीड हजारांपेक्षा अधिक आहेत. दलित आणि हिंदू मतदार तीन हजारांच्या घरात आहेत. त्यामुळे यंदा जाती-धर्माच्या मतांवर उमेदवारांच्या विजयाचे गणित असणार आहे. भाजप, बीएसपी आणि एमआयएमच्या उमेदवारांमध्येच टक्कर होणार असली तरी राष्ट्रवादीचे उमेदवार सय्यद शबाना सय्यद नजिमोद्दीन यांचेही आव्हान असणार आहे.
चौकट
एकूण मतदार : ४,६३६
पुरुष : २,५५०
महिला : २,०८६

Web Title: Triple collision in Aarti Nagar - Ward-34

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.