शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

तृणमूल, राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:27 IST

तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय राजकीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी या पक्षांना कारणे दाखवा नोटीस जारी करून या पक्षांचा राष्टÑीय राजकीय पक्षाचा दर्जा का रद्द करू नये, अशी विचारणा केली आहे. तसेच ५ आॅगस्टपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.सध्या काँग्रेस, भाजप, सीपीएम, सीपीआय, बसपा, एनसीपी आणि तृणमूल काँग्रेस हे आठ राष्टÑीय राजकीय पक्ष आहेत. नॅशनल पीपल्स पार्टीला मणिपूर, मेघालय आणि नागालँडमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता आहे.२०१४ मध्ये निवडणूक आयोगाने राष्टÑीय राजकीय पक्षांच्या दर्जाच्या निकषानुसार पात्र न ठरल्यामुळे तृणमूल काँग्रेस, एनसीपी आणि सीपीआय या तीन राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. तथापि, या राजकीय पक्षांनी साकडे घातल्यानंतर निवडणूक आयोगाने नरमाईची भूमिका घेत राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या दर्जासंबंधीच्या नियमात दुरुस्ती केली होती. राष्टÑीय किंवा प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत पाच वर्षांऐवजी दर दहा वर्षांनी आढावा घेतला जाईल (एक निवडणुकीऐवजी दोन निवडणुका), असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. बसपाने यावेळी लोकसभेच्या दहा जागा जिंकल्या असून, विधानसभेच्याही काही जिंकल्या आहेत. त्यामुळे बसपाचा राष्टÑीय दर्जा शाबूत राहील.तथापि, तृणमूल काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षांंना या नामुष्कीला सामोरे जावे लागू शकते.ईशान्य राज्यांतील खराब कामगिरीमुळे एनसीपीला राष्टÑीय दर्जा गमवावा लागण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचीही इतर राज्यांत उपस्थिती नाही. राष्टÑीय दर्जामुळे राजकीय पक्षांना सर्व राज्यांत कायमस्वरूपी एक निवडणूक चिन्ह राखता येते. याशिवाय निवडणुकीदरम्यान आकाशवाणी, दूरदर्शनवरून प्रचारासाठी ठराविक वेळ दिला जातो; तसेच नवी दिल्लीत पक्ष कार्यालय थाटता येते.>काय आहे निवडणूक आयोगाची नियमावलीनिवडणूक आयोगाची नियमावली, निवडणूक चिन्हांसदर्भातील (राखीव आणि वाटप) १९६८ च्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीत ६ टक्के मत मिळविणाऱ्या उमेदवारांच्या पक्षाला राष्टÑीय राजकीय पक्षाचा दिला जातो किंवा कोणत्याही राज्यांतून पक्षाचे चार खासदार निवडून आल्यास किंवा मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान दोन जाग जिंकणाºया अथवा चार राज्यांत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असलेल्या पक्षाला राष्टÑीय पक्षाचा दर्जा दिला जातो.२०१४ च्या निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने याबाबत मवाळ भूमिका घेतली होती; परंतु यावेळी निवडणूक आयोग गय करणार नाही, असे दिसते. या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केल्यास राष्टÑीय दर्जा असलेल्या पक्षांची संख्या ८ वरून ५ वर येईल. ईशान्य राज्यांतील खराब कामगिरीमुळे एनसीपीला राष्टÑीय दर्जा गमवावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जी