काळी पी लावून तृणमूल खासदारांचा सभात्याग
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:30+5:302014-12-18T00:40:30+5:30
नवी दिल्ली-शारदा चिटफंड घोटाळ्याच्या तपासात केंद्रीय तपास यंत्रणेचा (सीबीआय) गैरवापर केल्याबद्दल व सभागृहातील ध्वनिक्षेपक बंद केल्याचा आरोप करून तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत मंगळवारी काळ्या प्या लावून सभागृहाचा त्याग केला.

काळी पी लावून तृणमूल खासदारांचा सभात्याग
न ी दिल्ली-शारदा चिटफंड घोटाळ्याच्या तपासात केंद्रीय तपास यंत्रणेचा (सीबीआय) गैरवापर केल्याबद्दल व सभागृहातील ध्वनिक्षेपक बंद केल्याचा आरोप करून तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत मंगळवारी काळ्या पट्ट्या लावून सभागृहाचा त्याग केला.सकाळी कामकाज सुरू होताच हे सभासद अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन उभे राहिले. यावेळी त्यांनी कुठलाही गोंधळ घातला नाही वा घोषणाबाजी केली नाही. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी, सभागृहात प्रश्नोत्तराचे कामकाज सुरू ठेवले. काही वेळानंतर तृणमूलचे सदस्य सौगत राय यांनी, आपल्याला बोलू दिले जात नाही असे सांगून सभात्याग केला. संसद परिसरात असलेल्या म. गांधींच्या प्रतिमेसमोर या सदस्यांनी नंतर तोंडावर काळी पट्टी बांधून धरणे दिले.