चिटफंड घोटाळ्यात तृणमूल खासदारास नोटीस
By Admin | Updated: January 21, 2016 03:09 IST2016-01-21T03:09:50+5:302016-01-21T03:09:50+5:30
कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे खासदार विवेक गुप्ता यांना नोटीस बजावली आहे.

चिटफंड घोटाळ्यात तृणमूल खासदारास नोटीस
नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे खासदार विवेक गुप्ता यांना नोटीस बजावली आहे.
या घोटाळ्यात शारदा समूहावर चार एफआयआर नोंदलेले आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हजारो गुंतवणूकदारांना फसविल्याचा आरोप त्यात आहे.
गुंतवणूकदारांचे किमान १0 हजार कोटी रुपये कंपनीकडे अडकले आहेत. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी मे महिन्यात दिले होते.