शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ममतांना पुन्हा झटका; 24 तासात तिसरा आमदार भाजपात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 17:32 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

तृणमूल काँग्रेसचे आमदार मुनीरुल इस्लाम यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे. मुनीरुल इस्लाम यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेता गदाधर हाजरा, मोहम्मद आसिफ इकबाल आणि निमई दास सुद्धा भाजपात सामील झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील मिळालेल्या यशानंतर भाजपाने ममता बॅनर्जींना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पार्टीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

ममता बनर्जी यांच्या जवळचे नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपाने सुरु केला आहे. कालच तृणमूल काँग्रेसचे आमदार सुभ्रांशु रॉय, तुष्क्रांति भट्टाचार्य यांच्यासह 50 नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

भाजपाच्या धक्क्यानंतर ममतांच्या कॅबिनेटमध्ये फेरबदललोकसभा निवडणुकीत झालेला परिणाम लक्षात घेता ममता बॅनर्जी यांनी कॅबिनेटमध्ये फेरबदल केल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला उत्तर बंगाल आणि जंगलमहल परिसरात यश मिळवता आले नाही. यातच, या भागातून निवडून येणारे विनोय कृष्णा वर्मन आणि शांतिराम महतो यांच्याकडून मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. तर सुब्रता मुखर्जी, शुभेंदु अधिकारी, राजीव बॅनर्जी आणि ब्रात्या बसू यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.  

ममतांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही - राहुल सिन्हापश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,'पश्चिम बंगालमध्ये सहा महिने ते एक वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होतील. सध्याचे सरकार 2021 पर्यंत टिकणार नाही. तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार पोलीस आणि सीआयडीच्या दबावाखाली चालत आहे.'  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019