रतन टाटांच्या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेस संतप्त

By Admin | Updated: August 8, 2014 01:12 IST2014-08-08T01:12:10+5:302014-08-08T01:12:10+5:30

पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाची उणीव असल्याचे उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यावर पश्चिम बंगलाचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Trinamool Congress angry over Ratan Tata's remark | रतन टाटांच्या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेस संतप्त

रतन टाटांच्या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेस संतप्त

>कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाची उणीव असल्याचे उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल्या वक्तव्यावर पश्चिम बंगलाचे अर्थमंत्री अमित मित्र यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रतन टाटा यांना बहुधा स्मृतिभ्रंश झाला असावा, त्यामुळे ते अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका मित्र यांनी केली.
पश्चिम बंगालमध्ये औद्योगिक विकासाचे चिन्ह नाही, असे वक्तव्य रतन टाटा यांनी बुधवारी केले होते. इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या महिला अभ्यास गटाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.त्यामुळे आज मित्र यांनी टाटांवर तोंडसुख घेतले. 
टाटा वृद्ध झाले आहेत आणि त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. काय घडत आहे हे त्यांना का समजू शकत नाही, हे कळायला मार्ग नाही, असे मित्र म्हणाले. अनिल अंबानी आणि इमामी राज्यात सिमेंट कारखाने उभारत आहेत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Trinamool Congress angry over Ratan Tata's remark