कोलकात्यातील भाजपा मुख्यालयावर तृणमुल कार्यकर्त्यांचा हल्ला

By Admin | Updated: January 3, 2017 18:08 IST2017-01-03T17:39:53+5:302017-01-03T18:08:08+5:30

सुदीप बंडयोपाध्याय यांना चिटफंड घोटाळयात सीबीआयकडून अटक होताच भाजपा आणि तृणमुल काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे.

Trinamool activists attacked in BJP headquarters in Kolkata | कोलकात्यातील भाजपा मुख्यालयावर तृणमुल कार्यकर्त्यांचा हल्ला

कोलकात्यातील भाजपा मुख्यालयावर तृणमुल कार्यकर्त्यांचा हल्ला

 ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. 3 -  तृणमुल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडयोपाध्याय यांना चिटफंड घोटाळयात सीबीआयकडून अटक होताच भाजपा आणि तृणमुल काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे. तृणमुल काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी कोलकाता येथील भाजपा मुख्यालयावर हल्ला केला. 
 
मुख्यालयासमोर भाजप-तृणमुल कार्यकर्ते भिडले. घटनास्थळी मोठया प्रमाणावर पोलिस पथक दाखल झाले आहे. रोझ व्हॅली चिटफंड घोटाळयात सीबीआयने सुदीप बंडयोपाध्याय यांना अटक केली आहे. 
 
पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अटकेवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. मोदी त्यांच्या विरोधात बोलणा-यांचा आवाज दाबण्यासाठी सीबीआय, ईडी, आयटीचा वापर करत आहेत असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. 
 

Web Title: Trinamool activists attacked in BJP headquarters in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.