पाकिस्तानी वेबसाईटवर झळकला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 02:45 IST2020-08-16T02:45:35+5:302020-08-16T02:45:59+5:30
पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह अन्य वेबसाईटवर तिरंगा ध्वज फडकविला गेला.

पाकिस्तानी वेबसाईटवर झळकला तिरंगा
नवी दिल्ली : भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाच पाकिस्तानमधील काही वेबसाईट हॅक करण्यात आल्या. पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह अन्य वेबसाईटवर तिरंगा ध्वज फडकविला गेला. अगदी राम मंदिराच्या फोटोसह राम मंदिर बांधण्यासंदर्भातही मजकुर लिहिल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानच्या एका वेबसाईटच्या होमपेजवर हे काम इंडियन सायबर ट्रुपने केल्याचे म्हटले आहे. पेजवर तिरंग्यासह सत्यमेव जयते लिहिलेले आहे. त्याखाली तिरंगा ध्वज घेऊन मुले धावतांना दिसत आहेत. तसेच, भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर देशासाठी शहीद झालेल्यांना सलाम करण्यात आला आहे.