जंगलांवर आदिवासींचा अधिकार!

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30

भूसंपादन कायद्यावरून राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल

Tribal rights on forests! | जंगलांवर आदिवासींचा अधिकार!

जंगलांवर आदिवासींचा अधिकार!

संपादन कायद्यावरून राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल
कोरबा : जंगलांवर आदिवासींचा अधिकार आहे. कें द्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि छत्तीसगडमधील रमणसिंग सरकार केवळ दोन-तीन उद्योगपतींसाठीच काम करीत आहे आणि विकासाचा लाभ स्थानिक लोकांपर्यंत अजिबात पोहोचत नाही, असा स्पष्ट आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.
छत्तीसगडच्या कोरबा येथील खाण क्षेत्रात भूसंपादनाचा मुद्दा उपस्थित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या विकास मॉडेलवर प्रश्नचिन्ह लावले. मोदींच्या या विकास मॉडेलमुळे आदिवासींचा कोणताही फायदा होणार नाही, असे ते म्हणाले. त्यांनी कोळसा खाणींमुळे होणारे लोकांचे विस्थापन आणि भूसंपादनाच्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित करून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.
आपण शेतकर्‍यांप्रमाणेच आदिवासींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय मीडिया आदिवासींच्या प्रश्नांना फारसे महत्त्व देत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, मोदी हे विकासावर केवळ व्याख्यान देतात. विकास झालाच पाहिजे; पण या प्रक्रियेत आदिवासींचा काय वाटा आहे, हा माझा प्रश्न आहे. विकास सर्वांसाठी व्हायला पाहिजे. विकास केवळ दोन-तीन उद्योगपतींचाच होऊ नये. त्यांचे उद्योग उभे व्हावेत आणि त्यांनी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवावा आणि दुसरीकडे आदिवासी मुलांचे कसलेही भविष्य नसावे, असे मात्र होऊ नये. भारताच्या आदिवासींचे असे भविष्य आम्हाला नको आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Tribal rights on forests!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.