वाडीरत्नागिरी पंचायत समितीत तिरंगी लढत
By Admin | Updated: February 15, 2017 19:08 IST2017-02-15T19:08:52+5:302017-02-15T19:08:52+5:30
जोतिबा : वाडीरत्नागिरी पंचायत समिती मतदारसंघात माघारीनंतर आता तिरंगी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झाली असून, उमेदवार पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. कार्यकर्ते आपलाच नेता निवडून येणार असल्याचे आत्मविश्वासाने मतदाराना पटवून सांगण्यात दंग झाले आहेत.

वाडीरत्नागिरी पंचायत समितीत तिरंगी लढत
ज तिबा : वाडीरत्नागिरी पंचायत समिती मतदारसंघात माघारीनंतर आता तिरंगी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झाली असून, उमेदवार पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. कार्यकर्ते आपलाच नेता निवडून येणार असल्याचे आत्मविश्वासाने मतदाराना पटवून सांगण्यात दंग झाले आहेत.वाडीरत्नागिरी पंचायत समिती मतदारसंघात एकूण १५हजार १४२ मतदान आहे. या पैकी वाडीरत्नागिरी, पोहाळे, गिरोली, दाणेवाडी या भागात ६००० हजार मतदान आहे. तर उर्वरित ९ हजार १४२ मतदान हे बांबरवाडी, मिठारवाडी, आंबवडे, जगदाळेवाडी, पोवारवाडी, कोतमिरवाडी, धारवाडी, नावली, तुरुकवाडी, म्हाळुंगे, जेऊर, बोगेवाडी, सोमवारपेठ, शुक्र वार पेठ, नेबापूर, आपटी, बुधवारपेठ, वेखंडवाडी, बांदेवाडी या भागात आहे. हा मतदारसंघ यावेळी ओबीसी पुरुष आरक्षित आहे. आतापर्यंत या मतदारसंघावर जनसुराज्य पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. सलग तीन वेळा निवडून आलेले विष्णुपंत दादर्णे यांनी यावेळी एक पाऊल मागे घेऊन जनसुराज्यचा विजयाचा षटकार मारण्यासाठी अनिल कंदुरकर यांच्यामागे मोठी ताकद उभी केली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जोतिबा डोंगरावरील शिवाजी सांगळे यांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान उभे केले आहे. विश्वास पाटील (आपटीकर) यांनी या दोघांना टक्कर देण्यासाठी अपक्ष म्हणून मोठ्या ताकदीने उभे राहिले आहेत. त्यामुळे सुरुवातीला दुरंगी वाटणारी निवडणूक तिरंगी होणार आहे. वाडीरत्नागिरी मतदारसंघात जनसुराज्य,भाजप, रिपाइंच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना असे लढतीचे चित्र दिसत आहे.