Earthquake in Delhi:दिल्ली आणि एनसीआरमधील नागरिकांची आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झोप उडाली. सोमवारी पहाटे ३ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी अचानक इमारती हलू लागल्या. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर धाव घेतली. भूकंपाचे हादरले बसल्यानंतरचे अनेक व्हिडीओ आता समोर आले आहेत.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्र दिल्लीपासून जवळच पाच किमी अंतरावर किलोमीटर जमिनीमध्ये होते.
भूकंप आल्यानंतर तीव्र झटके जाणवले. काही सेंकदापर्यंत हादरले जाणवले, ज्यामुळे इमारतींमध्ये कंपने जाणवली. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता नेहमीपेक्षा अधिक असल्याने नागरिक घाबरले. अनेकांनी घराबाहेरील मोकळ्या जागांच्या ठिकाणी धाव घेतली.
भूकंपाचे केंद्र कुठे होते?
पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या माहितीने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदु धौला कुआमधील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन जवळ होते. ज्याठिकाणी भूकंपाचा केंद्र होते, त्याठिकाणी एक ओढा आहे. या क्षेत्रात दर दोन-तीन वर्षांनी कमी तीव्रतेचे भूकंप होतात. २०१५ मध्ये याच ठिकाणी ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.
दरम्यान, सोमवारी (१७ फेब्रुवारी) दिल्लीत झालेल्या भूकंपाचे धक्के शेजारील राज्यांमध्येही जाणवले. भूकंपाचे धक्के जास्त जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पंतप्रधान मोदींनी लोकांना केले आवाहन
पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर हॅण्डलवर पोस्ट केली आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे झटके जाणवले. सर्वांनी शांत राहावे आणि सुरक्षा आणि काळजी घेण्याबद्दलच्या सूचनांचे पालन करावे. अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत', असे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले आहे.
पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी काय झाले?
-दिल्ली-एनसीआर परिसरात पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. ज्यामुळे इमारती हलल्याचे जाणवले.
-अचानक घरातील वस्तू आणि इमारत हलू लागल्याने घाबरलेल्या नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.
-भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुमन शर्मा या महिलेने सांगितले की, 'असं जाणवलं की, जमिनीच्या खाली काहीतरी तुटत आहे. तुटत असल्याचा आवाज आला आणि जमीन हलू लागली. त्या आवाजानेच मी झोपेतून जागी झाले. मी घाबरले. त्यानंतर मी माझ्या ५ वर्षाच्या मुलाला घेतले आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर धावले. बाहेर खूप लोक जमा झालेले होते. लोक घाबरलेले होते.'