शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 00:53 IST

टीडीपीनंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते बंदी संजय कुमार यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे.

तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचा दावा आणि आरोपांवरून राजकारण तापताना दिसत आहे. टीडीपीनंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते बंदी संजय कुमार यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, "हिंदूंसोबत झालेल्या मोठ्या विश्वासघातासाठी देव कधीही क्षमा करणार नाही."

बंदी संजय कुमार यांनी X वर लिहिले आहे, "लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वाप करणे, तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी यांची पूजा करणाऱ्या हिंदूंच्या आस्थेसोबत करण्यात आलेला मोठा विश्वासघात आहे. इतर समुदायाच्या लोकांना आणि नास्तिकांना कर्मचारी म्हणून आणि टीटीडी बोर्डात सहभागी केल्याने भ्रष्टाचार आणि हिंदूंच्या आस्थेप्रति अनादर वाढेल, अशी चिंता आम्ही यापूर्वीच व्यक्त केली होती." बंदी संजय कुमार यांची मोठी मागणी - बंदी संजय कुमार यांनी पुढे लिहिले आहे की, "सध्याच्या आंध्र प्रदेश सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल. तसेच, या प्रकरणातील दोषी व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी. याशिवाय, तिरूमलाच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यात यावे," अशी आमची मागणी आहे.

गुजरातमध्ये केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. काय आहे लॅब अहवाल? -अहवालानुसार, वायएसआरसीपी सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आली. तुपात फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळून आले होते. तसेच, चरबी एक अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे, जे डुकरांच्या चरबीयुक्त उतकांपासून घेतले जाते. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेशBJPभाजपा