सुखाचा प्रवास म्हणजे मध्य प्रदेशची यात्रा

By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:14+5:302015-06-29T00:38:14+5:30

सुखाचा प्रवास म्हणजेच मध्य प्रदेशची यात्रा

Traveling to Madhya Pradesh is a journey of happiness | सुखाचा प्रवास म्हणजे मध्य प्रदेशची यात्रा

सुखाचा प्रवास म्हणजे मध्य प्रदेशची यात्रा

खाचा प्रवास म्हणजेच मध्य प्रदेशची यात्रा
नागपूर : मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया म्हणाले, गुळगुळीत रस्ते, कर्जमुक्ती आणि विकासाकडे गतीने धावणारा प्रदेश म्हणून आता मध्य प्रदेशची ओळख निर्माण झाली आहे. पूर्वी लोक मध्य प्रदेशात यायचे तेव्हा प्रवासादरम्यान त्यांना रस्त्यावर धक्केच बसायचे. कारण मोठाले खड्डे रस्त्यात निर्माण झाले होते. धक्के लागल्यावर लोक समजून जायचे की, आपण मध्य प्रदेशच्या रस्त्यांवर आहोत. पण आता स्थिती वेगळी आहे. वाहन बिना धक्क्याने आणि सहजपणे चालत असेल तर लोक समजून जातात की, आपण मध्य प्रदेशात पोहोचलो आहोत.
मलैया म्हणाले, मध्य प्रदेश शासनाने मागील काही वर्षांत मूलभूत विकासासाठी परिश्रम घेतले आहेत. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. मध्य प्रदेश सरकारवर ९१ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे कमी कर्ज आहे. एखाद्या विकास कार्यासाठी गरज पडल्यास अधिक कर्ज घेण्याची शासनाची क्षमता आहे. गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेश शासनाच्या लाभात अधिक वृद्धी झाली आहे. शासनाच्या अर्थनीतीत आयोजन खर्च केवळ ८ ते ९ टक्के आहे. मात्र विविध योजनांवर ४० टक्के खर्च करण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात कृषी सिंचन साडेसात लाख हेक्टर होते. आता ते ३० लाख हेक्टरपर्यंत विस्तारित झाले आहे. सरकार ग्रामीण क्षेत्रातील रोजगार वाढविण्यासाठी स्वयंरोजगारावर भर देत आहे. ग्रामीण क्षेत्रातून होणारे लोकांचे पलायन हे पलायन नसून चांगल्या रोजगाराच्या संधीचा शोध आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Traveling to Madhya Pradesh is a journey of happiness