प्रवासी निवार्‍याची गरज

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:07+5:302015-06-12T17:38:07+5:30

बोधडी : या परिसरातील अनेक खेड्यांचा बोधडीशी संपर्क येतो़ बाजारपेठही मोठी आहे़ शासकीय-निमशासकीय कार्यालये आहेत़ मात्र प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना बसस्थांब्यावर ताटकळत बसावे लागते़

Traveler Reserves Requirement | प्रवासी निवार्‍याची गरज

प्रवासी निवार्‍याची गरज

धडी : या परिसरातील अनेक खेड्यांचा बोधडीशी संपर्क येतो़ बाजारपेठही मोठी आहे़ शासकीय-निमशासकीय कार्यालये आहेत़ मात्र प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना बसस्थांब्यावर ताटकळत बसावे लागते़
नांदेड, निर्मल, म्हैसा आदी महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना बोधडी येथे यावे लागते़ परिसरातील विद्यार्थीही शिक्षणासाठी बोधडीला येतात़ मात्र प्रवासी निवार्‍याअभावी विद्यार्थी प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागते़ पावसाळ्यात व उन्हाळ्यात हॉटेल किंवा दुकानाचा सहारा घ्यावा लागतो़ पिण्याच्या पाण्याचीही टंचाई आहे़ लघूशंकागृह नसल्याने महिला प्रवाशांना मोठी अडचण होत आहे़ खासदार व आमदार यांनी स्थानिक विकास निधीतून बोधडी येथे प्रवासी निवारा बांधावा अशी मागणी होत आहे़

वीज पडून बैल ठार
बोधडी : परिसरातील पिंपरफोडी शिवारात वादळी वारा व पावसामुळे गोठ्यावर वीज पडून एक बैल दगावल्याची घटना १० जूनच्या रात्री घडली़ परमेश्वर झळके यांच्या मालकीचा बैल होता़ त्याची किंमत ३० हजार रुपये होती, असे झळके यांनी सांगितले़

४८ तासाच्या आत नैसर्गिक आपत्ती अनुदान
मुक्रमाबाद : गोजेगाव ता़मुखेड येथे वीज पडून मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसा पत्नीला तहसीलदारांनी ४८ तासाच्या आत नैसर्गिक आपत्ती अनुदान दिले़ माधव रावसाहेब सूर्यवंशी यांचे दोन दिवसापूर्वी वीज पडून मृत्यू झाला होता़ ११ जून रोजी दुपारी तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी राजेश्वर पद्मावार, तलाठी एस़व्ही़मुंडे यांनी मयताची पत्नी निलावती सूर्यवंशी यांना दीड लाख रुपयांचा नैसर्गिक आपत्ती अनुदानाचा चेक दिला़ यावेळी सरपंच दत्ता पाटील, पोलिस पाटील शिवलिंग वाघमारे उपस्थित होते़

Web Title: Traveler Reserves Requirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.