प्रवाशाला हार्टअटॅक; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

By Admin | Updated: June 16, 2015 02:44 IST2015-06-16T02:44:07+5:302015-06-16T02:44:07+5:30

विमानातील एका प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने भुवनेश्वरवरून दिल्लीकडे निघालेले इंडिगोचे विमान आपत्स्थितीत लखनौ विमानतळावर

Traveler Heart Attack; Emergency landing of the plane | प्रवाशाला हार्टअटॅक; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

प्रवाशाला हार्टअटॅक; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

लखनौ : विमानातील एका प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने भुवनेश्वरवरून दिल्लीकडे निघालेले इंडिगोचे विमान आपत्स्थितीत लखनौ विमानतळावर उतरविण्यात आले; मात्र याउपरही प्रवाशाचे प्राण वाचू शकले नाहीत.
इंडिगोचे एक विमान रविवारी भुवनेश्वरवरून दिल्लीकडे निघाले होते. प्रवासी शिवकुमार पाणिग्रही यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे रात्री विमान आपत्स्थितीत लखनौ विमानतळावर उतरविण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर पाणिग्रही यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. तथापि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Traveler Heart Attack; Emergency landing of the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.