चेन्नई ते शिर्डी पायी प्रवास! दहा साईभक्त : ३१ दिवसांचा कालावधी

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:36+5:302015-09-07T23:27:36+5:30

शिर्डी : साई दर्शनासाठी ३१ दिवसांत चेन्नई ते शिर्डी असा तब्बल दीड हजार किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या दहा साईभक्तांनी सोमवारी साई समाधीचे दर्शन घेतले. चंद्रमोली यांच्या नेतृत्वाखाली सलग पाच वर्ष पदयात्रेने आलेल्या या साईभक्तांचा साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे व उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी सत्कार केला.

Travel from Chennai to Shirdi! Ten devotees: 31 days duration | चेन्नई ते शिर्डी पायी प्रवास! दहा साईभक्त : ३१ दिवसांचा कालावधी

चेन्नई ते शिर्डी पायी प्रवास! दहा साईभक्त : ३१ दिवसांचा कालावधी

र्डी : साई दर्शनासाठी ३१ दिवसांत चेन्नई ते शिर्डी असा तब्बल दीड हजार किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या दहा साईभक्तांनी सोमवारी साई समाधीचे दर्शन घेतले. चंद्रमोली यांच्या नेतृत्वाखाली सलग पाच वर्ष पदयात्रेने आलेल्या या साईभक्तांचा साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे व उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी सत्कार केला.
चेन्नईचे साईभक्त चंद्रमोली यांनी त्यांचे मित्र श्रीधर गुप्ता,अशोक कुमार, साई आनंद, शक्ती दयालन, बी.दंडापानी, मोहन, एम.आर. गोविंदन, एम.चोकलिंगन व पी.सतीश यांच्यासह ५ ऑगस्ट रोजी महाबलीपूरमहून (मद्रास) शिर्डीसाठी पायी प्रवास सुरू केला. दररोज ४० ते ५० किलोमीटर असा प्रवास करून हे भाविक ३१ दिवसांनी शिर्डीत पोहोचले.
प्रथम एकटेच येणार्‍या चंद्रमोली यांनी सांगितले की,आम्ही गेल्या पाच वर्षांपासून मद्रास ते शिर्डी पायी येत असून साईंच्या आशीर्वादाने आमची यात्रा सफल होत आहे. यंदा भाविकांची संख्या दहापर्यंत गेली आहे. महाराष्ट्रात चांगल्या पावसासाठी आम्ही बाबांना प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Travel from Chennai to Shirdi! Ten devotees: 31 days duration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.