परिवहनमंत्र्याच्या मुलाची वाहतूक पोलिसाशी हुज्जत

By Admin | Updated: August 12, 2015 23:54 IST2015-08-12T23:54:30+5:302015-08-12T23:54:30+5:30

रावतेंचे स्पष्टीकरण : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत नव्हता

Transport Minister's son's traffic violation with the police | परिवहनमंत्र्याच्या मुलाची वाहतूक पोलिसाशी हुज्जत

परिवहनमंत्र्याच्या मुलाची वाहतूक पोलिसाशी हुज्जत

वतेंचे स्पष्टीकरण : मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत नव्हता
मुंबई : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मुलाने मंगळवारी रात्री मुंबई वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. त्याबद्दल वाहतूक पोलिसांकडून बाराशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्याने मद्यपान केले होते, अशी चर्चा होती. दिवाकर रावते यांनी मात्र याचा इन्कार केला आहे.
मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास माहीम येथे हिंदुजा हॉस्पिटच्या जंक्शनजवळ मंत्री रावते यांचा मुलगा उन्मेश हा आपल्या मित्रासोबत एका गाडीत होता. यावेळी पेट्रोलिंग करणार्‍या एका वाहतूक पोलिसाने त्यांना हटकले आणि लायसन्सची मागणी केली. यावरून त्या पोलिसाशी त्या दोघांची बाचाबाची झाली. त्यानंतर या दोघांना कपडा बाजार येथील पोलीस चौकीत नेण्यात आले. त्यावेळी उन्मेश याने दारु प्यायल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले, असे पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
मात्र उन्मेषने आयटीचे शिक्षण घेतले आहे. तो कधीच मद्यपान करीत नाही, असे मंत्री रावते यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
---------------
वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या गुन्ह्याकरिता आपण आपला मुलगा उन्मेष याला १२०० रुपयांचा दंड भरायला लावला असून परिवहनमंत्री आपल्या मुलाला सोडत नाही तर इतरांनाही सोडणार नाही हाच संदेश यातून आपण दिला आहे.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

Web Title: Transport Minister's son's traffic violation with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.