शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

अस्थानांवरील आरोपांचा तपास करणाऱ्या अधिका-यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 05:07 IST

‘सीबीआय’चे हंगामी संचालक म्हणून बुधवारी सकाळी पदभार स्वीकारताच एम. नागेश्वर राव यांनी १३ प्रमुख अधिका-यांच्या बदल्या केल्या किंवा काहींकडे अतिरिक्त कार्यभार दिला.

नवी दिल्ली- ‘सीबीआय’चे हंगामी संचालक म्हणून बुधवारी सकाळी पदभार स्वीकारताच एम. नागेश्वर राव यांनी १३ प्रमुख अधिका-यांच्या बदल्या केल्या किंवा काहींकडे अतिरिक्त कार्यभार दिला. विशेष संचालक राकेश अस्थाना व इतरांविरुद्धच्या लाचखोरी व ‘खंडणी वसुली’च्या आरोपांची चौकशीवर देखरेख करणाºया अधिकाºयांचाही बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे.राकेश अस्थाना यांच्यावरील आरोपांची चौकशी करणारे अजय बस्सी यांना थेट पोर्ट ब्लेअर येथे पाठविण्यात आले आहे. अस्थाना यांच्याविरुद्धच्या तपासाचे पर्यवेक्षण करणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिट-३चे उपमहानिरीक्षक मनोज कुमार सिन्हा यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. त्यांच्याजागी चंदीगड एसीबीचे प्रमुख तरुण गऊबा यांना आणण्यात आले.या बदल्यांनंतर आता अस्थाना यांच्याविरुद्धच्या आरोपांचा तपास करणाºया तपासी तुकडीत उपमहानिरीक्षक तरुण गऊबा, अधीक्षक सतीश डागर व सहसंचालक व्ही. मुरुगेशन यांचा समावेशआहे.>सीबाआयमध्ये अशा केल्या बदल्या1. मनीषकुमार सिन्हा, डीआयजी, एसी३ व बीएस अ‍ॅण्ड एफसी, नवी दिल्ली. (नागपूर एसीबीमध्ये बदली)2. तरुण गऊबा, डीआयजी, एसीबी, चंदीगड. (मनीष सिन्हा यांच्या जागी एसी३ दिल्लीला बदली)3. जसबीर सिंह, डीआयजी, स्पेशल क्राईम. (एचओबी बीएस अ‍ॅण्ड एफसीचा अतिरिक्त पदभार)4. अनीस प्रसाद, डीआयजी, सर्व्हेलन्स युनिट. (सर्व्हेलन्स युनिट१मध्ये प्रशासन व कार्मिक विभागात बदली)5. के.आर. चौरसिया, एचओडी, इकॉनॉमिक आॅफेन्सेस-१. (डीआयजी, सर्व्हेलन्स युनिट-१चा अतिरिक्त पदभार)6. राम गोपाल, एचओबी, एससीबी, चंदीगड.(एचओबी, एसीबी, चंदीगडचा अतिरिक्त पदभार)7. सतीश डागर, एसपी, इकॉनॉमिक आॅफेन्सेस-३. (एसी-३मध्ये बदली)8. ए.के. बस्सी, डेप्युटी एसपी, सीबीआय, एसी-३. (पोर्टब्लेअर अ‍ॅन्टिकरप्शनमध्ये बदली)9. एस.एस. गुर्म, अ‍ॅडिशनल एसपी, सीबाआय एसी-३ दिल्ली. (एसीबी जबलपूरमध्ये बदली)10. अरुणकुमार शर्मा, जेडी, पॉलिसी. (आता जेडी एमडीएमए)11. ए. साई मनोहर, हेड, झोन/जेडी चंदीगड, विथ हेडक्वॉर्टर दिल्ली. (एसआयटी व टीएफसी झोनचा अतिरिक्त पदभार)12. व्ही. मुरुगेसन, हेड, झोन एसी-२ (हेडक्वॉर्टर). (एचओझेड/जेडी एसी-१ (हेडक्वॉर्टर)चा अतिरिक्त पदभार)13. अमितकुमार, डीआयजी, एचओबी, ईओ-३. (जेडी पॉलिसी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार)>आलोक वर्मा यांची सुप्रीम कोर्टात धावआपल्याला रजेवर पाठवून नागेश्वर राव यांना ‘सीबीआय’चे हंगामी संचालक नेमण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध आलोक वर्मा यांनी बुधवारी तातडीने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.सकाळी सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाचे कामकाज सुरू होताच आलोक वर्मा त्यांची कैफियत घेऊन ज्येष्ठ वकील गोपाळ शंकरनारायणन यांच्यासोबत उभे राहिले.या निर्णयाने अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुरू असलेल्या तपासात विघ्ने येणार असल्याने न्यायालयाने तातडीने हस्तक्षप करावा, अशी त्यांची विनंती होती.सरन्यायाधीशांनी विचारणा केल्यावर आलोक वर्मा यांनी सांगितले की, रजेवर पाठविण्याचा हा आदेश सकाळी ६ वाजता कळवण्यात आला. हे सर्व एवढे अनपेक्षितपणे घडले की, अजून रीतसर याचिकाही तयार करता आलेली नाही. यावर सरन्यायाधीशांनी सांगितले की, दिवसभरात याचिका तयार करून ती दाखल करा. शुक्रवारी ती सुनावणीसाठी लावली जाईल.तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा रद्द करावा यासाठी विशेष संचालक अस्थाना दिल्ली उच्च न्यायालयात गेल्यानंतर संचालक वर्मा यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात जावे, हे लक्षणीय आहे. रजेविरुद्ध अस्थाना हे मात्रबुधवारी सायंकाळ पर्यंत न्यायालयात गेलेनव्हते.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग