महापालिकेतील अधिकार्‍यांच्या बदल्या

By Admin | Updated: August 7, 2015 21:35 IST2015-08-07T21:35:23+5:302015-08-07T21:35:23+5:30

नवी मुंबई : महापालिकेच्या आठ अधिकार्‍यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. यामध्ये चार विभाग अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

Transfers of municipal officials | महापालिकेतील अधिकार्‍यांच्या बदल्या

महापालिकेतील अधिकार्‍यांच्या बदल्या

ी मुंबई : महापालिकेच्या आठ अधिकार्‍यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. यामध्ये चार विभाग अधिकार्‍यांचाही समावेश आहे.
पालिकेच्या घनकचरा विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महेंद्र सप्रे यांची ऐरोली विभाग अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. कर आकारणी विभागातील प्रशासकीय अधिकारी राजेश ठाकूर यांची बेलापूर विभाग कार्यालयात तर एलबीटी विभागातील महेंद्रसिंग ठोके यांची वाशी विभाग अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. वाशीमध्ये विभाग अधिकारी असलेल्या राजेंद्र चौगुले यांना सार्वजनिक रुग्णालयाचा पदभार दिला आहे. बेलापूरचे विभाग अधिकारी मनोहर गांगुर्डे यांची घनकचरा विभागात बदली केली आहे. नेरूळचे विभाग अधिकारी सूर्यकांत विटावकर यांची करआकारणी विभागात तर ऐरोलीचे विभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील यांना एलबीटी विभागात हलविले आहे. उत्तम खरात यांची नेरूळचे विभाग अधिकारी म्हणून बदली केली आहे.
अनेक अधिकार्‍यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसताना बदल्या झाल्या आहेत. काही विभाग कार्यालयांमध्ये अतिक्रमणांच्या व इतर तक्रारीही वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बदल्या झाल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
...
गरड मुख्य लेखा व वित्त अधिकारी
महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर सरकारने धनराज गरड यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वीही त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती परंतु त्यांना हजर करून घेण्यात आले नव्हते. हे पद आतापर्यंत पालिकेतील अधिकार्‍यांसाठी राखीव होते. परंतु त्या पदाचा दर्जा वाढविल्यामुळे आता सरकारकडून त्या पदावर अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे.

Web Title: Transfers of municipal officials