जिल्ह्यातील सात तहसीलदारांची बदली दोन जिल्ांर्गत बदली : जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश प्राप्त नाही
By Admin | Updated: November 5, 2015 23:30 IST2015-11-05T23:30:18+5:302015-11-05T23:30:18+5:30
प्रादेशिकसाठी

जिल्ह्यातील सात तहसीलदारांची बदली दोन जिल्ांर्गत बदली : जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश प्राप्त नाही
प रादेशिकसाठीजळगाव : जिल्ह्यातील सात तहसीलदारांच्या बदली झाल्या आहेत मात्र याबाबत अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश प्राप्त झालेली नाहीत.प्राप्त माहितीनुसार भुसावळ तहसीलदार वैशाली हिंगे यांची नासिकच्या पुरवठा तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी अहमदनगर जिल्ातील शेवगाव येथील हरिष सोनार यांची नियुक्ती झाली आहे. पाचोर्याचे तहसीलदार गणेश मरकड यांची पारोळा येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी मालेगाव येथील दीपक पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पारोळ्याचे तहसीलदार सुरेश कोळी यांची मालेगाव येथे बदली झाली आहे. बोदवड येथील एस.ए.खैरनार यांना धरणगाव येथे नियुक्ती दिली आहे. त्यांच्या जागी जाफ्राबाद येथील भाऊसाहेब थोरात यांना नियुक्ती दिली आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांना मुक्ताईनगर येथे नियुक्ती दिली आहे. तर जामखेड येथील तहसीलदार प्रदीप कुलकर्णी यांची तहसीलदार महसूल जळगाव या पदावर नियुक्ती झाली आहे. या बदल्यांना जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप आदेश प्राप्त झालेले नाहीत.