मौदा एसडीओंची बदली रद्द
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:13+5:302015-02-13T23:11:13+5:30
नागपूर : महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या नागपूर खंडपीठाने मौदाचे एसडीओ (उपविभागीय अधिकारी) चंद्रकांत बोरकर यांची बदली रद्द केली आहे. शासनाने गेल्या १ जानेवारी रोजी आदेश जारी करून बोरकर यांची भंडारा येथे बदली केली होती. या आदेशाला बोरकर यांनी लवादात आव्हान दिले होते. ते १० ऑगस्ट २०१३ रोजी चंद्रपूर येथून मौदाला बदलून आले होते. येत्या ३१ ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. कायद्यानुसार अपवादात्मक परिस्थिती वगळता तीन वर्षांपर्यंत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली करता येत नाही. तसेच, निवृत्तीची तारीख जवळ असल्यास बदली करणे अवैध आहे, असे बोरकर यांचे म्हणणे होते. बोरकर यांच्यातर्फे ॲड. पी.बी. पाटील व ॲड. ए.डी. डांगोरे यांनी बाजू मांडली.

मौदा एसडीओंची बदली रद्द
न गपूर : महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या नागपूर खंडपीठाने मौदाचे एसडीओ (उपविभागीय अधिकारी) चंद्रकांत बोरकर यांची बदली रद्द केली आहे. शासनाने गेल्या १ जानेवारी रोजी आदेश जारी करून बोरकर यांची भंडारा येथे बदली केली होती. या आदेशाला बोरकर यांनी लवादात आव्हान दिले होते. ते १० ऑगस्ट २०१३ रोजी चंद्रपूर येथून मौदाला बदलून आले होते. येत्या ३१ ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. कायद्यानुसार अपवादात्मक परिस्थिती वगळता तीन वर्षांपर्यंत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली करता येत नाही. तसेच, निवृत्तीची तारीख जवळ असल्यास बदली करणे अवैध आहे, असे बोरकर यांचे म्हणणे होते. बोरकर यांच्यातर्फे ॲड. पी.बी. पाटील व ॲड. ए.डी. डांगोरे यांनी बाजू मांडली.