पंचायत समिती सदस्यांचे प्रशिक्षण
By Admin | Updated: January 6, 2015 00:12 IST2015-01-05T22:04:19+5:302015-01-06T00:12:43+5:30
नाशिक : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रशिक्षणास जिल्ात प्रारंभ झाला आहे़

पंचायत समिती सदस्यांचे प्रशिक्षण
नाशिक : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रशिक्षणास जिल्ात प्रारंभ झाला आहे़
जानेवारीमध्ये प्रथम पंचायत समिती सदस्यांचे प्रशिक्षण होत असून, नाशिक, दिंडोरी व सिन्नर पंचायत समिती सदस्यांचे प्रशिक्षण झाले असून, उर्वरित पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांचे क्रमश: प्रशिक्षण होणार आहे़ यामध्ये महिला सदस्यांसाठी स्वतंत्ररीत्या क्रांतिज्योती प्रशिक्षण देण्यात येत आहे़ यामध्ये महिला सदस्यांना पंचायत राज कामकाजाची माहिती देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, अभ्यासात्मक खेळातून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे़ यामध्ये सर्व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़