कौशल्य वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:57+5:302015-02-13T23:10:57+5:30
नागपूर : महसूल विभागातील कामकाजाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कौशल्य वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
न गपूर : महसूल विभागातील कामकाजाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा अधिक तत्परतेने देण्यासाठी कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. महसूल यंत्रणेतील नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा आराखडा तयार करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष विभागीय आयुक्त अनुप कुमार आहेत. मनरेगाचे आयुक्त एम. संकरनारायणन, उपायुक्त (रोहयो) हेमंतकुमार पवार यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)-०-००-०-०-०-०-सिकलसेल परीक्षार्थींनावेळेची सवलतनागपूर: दहावी आणि बारावी परीक्षेस बसणाऱ्या सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रत्येक तासामागे २० मिनिटे जास्तीचा वेळ देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक किंवा प्राचार्याकडे अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र, छायाचित्र संलग्न करावे लागतील, असे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने कळविले आहे. (प्रतिनिधी)