जिल्‘ांच्या ठिकाणी सुरू करणार प्रशिक्षण केंद्र...जोड

By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:42+5:302015-02-21T00:49:42+5:30

जीवनात मोठे व्हायचे असेल तर संधी मिळेल तिथे जाण्याची तयारी ठेवा. संधी मिळाली तर सकारात्मक विचार करा, असे आवाहन राजेंद्र पाटणी यांनी केले. कैलास झांजरी म्हणाले, कमल नयन बजाज यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा मेळावा होत असल्याचा आनंद आहे. यातून विदर्भातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच कमवा आणि शिका या योजनेचाही पर्याय उपलब्ध आहे.

Training centers to be started in the district ... attachments | जिल्‘ांच्या ठिकाणी सुरू करणार प्रशिक्षण केंद्र...जोड

जिल्‘ांच्या ठिकाणी सुरू करणार प्रशिक्षण केंद्र...जोड

वनात मोठे व्हायचे असेल तर संधी मिळेल तिथे जाण्याची तयारी ठेवा. संधी मिळाली तर सकारात्मक विचार करा, असे आवाहन राजेंद्र पाटणी यांनी केले. कैलास झांजरी म्हणाले, कमल नयन बजाज यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा मेळावा होत असल्याचा आनंद आहे. यातून विदर्भातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच कमवा आणि शिका या योजनेचाही पर्याय उपलब्ध आहे.
सरकारने सहकार्य केले तर औरंगाबादप्रमाणे नागपुरात उद्योग उभारण्याची तयारी आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन ते तीन हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही संजीव वासुदेव यांनी दिली. सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी तर आभार श्रीकांत बडवे यांनी मानले. मेळाव्याला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
चौकट...
उद्योगांसाठी इको पद्धती
जगातील उद्योजकांची भारतात येण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रातील उद्योजकांना वीज उपलब्ध केली जाईल. अमरावती येथे टेक्सटाईल्स पार्क उभारला जात आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. येथील उद्योगांना चालना देण्यासाठी इकोपद्धती तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Training centers to be started in the district ... attachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.