शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेनं प्रवास करताना तिकीट हरवलं तरी चिंता नको, करा फक्त एक काम अन् प्रवास होईल सुकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 19:40 IST

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काहीवेळा असं घडतं की अचानक प्रवास केल्यामुळे तिकिट खिडकीतून आपत्कालीन स्थितीत तिकीट काढावं लागतं.

नवी दिल्ली-

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काहीवेळा असं घडतं की अचानक प्रवास केल्यामुळे तिकिट खिडकीतून आपत्कालीन स्थितीत तिकीट काढावं लागतं. अशा परिस्थितीत घाईगडबडीत तुमचं तिकीट कुठेतरी हरवलं तर तुम्ही काय कराल? तुमचं तिकीट हरवलं तर काळजी करण्याची गरज नाही. कारण यासाठी भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी एक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

रेल्वेचं तिकीट हरवल्यास काय करावं हे जाणून घेऊयात. तसंच तुमचं तिकीट कापलं किंवा फाटलं तरी तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास पूर्ण करू शकता आणि टीसी तुम्हाला त्रास देणार नाही. 

तिकीट हरवले तर हे काम करातुमचे तिकीट हरवलं तर तुम्ही तिकीट खिडकीतून त्याच प्रवासासाठी डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता. परंतु, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही फक्त २ अटींवर डुप्लिकेट तिकीट मिळवू शकता एकतर तिकीट कन्फर्म असेल तर किंवा आरएसी म्हणजेच कॅन्सलेशनविरुद्ध आरक्षण तिकीट असेल तरच डुप्लिकेट तिकीट मिळतं. 

तिकीट 50 रुपयांना मिळेलतिकीट हरवल्यास, डुप्लिकेट तिकिटासाठी तुम्हाला स्लीपर श्रेणीसाठी ५० रुपये आणि त्यावरील श्रेणीसाठी १०० रुपये शुल्क द्यावं लागेल. दुसरीकडे, जर तिकीट कापलं गेलं तर तुम्हाला तिकिटाच्या रकमेच्या २५% भरावे लागतील.

रिफंडही मिळवता येतोजर तुमचं हरवलेलं तिकीट सापडलं आणि तुम्ही डुप्लिकेट तिकीट बनवलं असेल तर तुम्ही तुमच्या डुप्लिकेट तिकिटाचं रिफंड देखील घेऊ शकता. २० रुपये किंवा ५% रक्कम कापल्यानंतर, उर्वरित पैसे तुम्हाला परत केले जातात.

प्रवास केला नाही तरी रिफंड मिळतोजर तुम्हाला डुप्लिकेट होण्यासाठी वेळ लागला आणि तुम्हाला कोणत्याही कारणामुळे प्रवास करता आला नाही, तर तुम्ही TTE शी संपर्क साधून संपूर्ण घटना TTE ला सांगू शकता. त्याच वेळी, काउंटरवरून घेतलेलं तिकीट परत करून परतावा मिळू शकतो.

टॅग्स :railwayरेल्वे