रेल्वेची स्कूल बसला धडक, १० मुले ठार
By Admin | Updated: July 26, 2016 01:28 IST2016-07-26T01:28:47+5:302016-07-26T01:28:47+5:30
रेल्वेचे मानवरहित फाटक ओलांडताना स्कूल व्हॅनला रेल्वेची धडक बसून दहा लहान मुले मृत्युमुखी पडली. उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात सोमवारी हा भीषण अपघात झाला.
रेल्वेची स्कूल बसला धडक, १० मुले ठार
नवी दिल्ली : रेल्वेचे मानवरहित फाटक ओलांडताना स्कूल व्हॅनला रेल्वेची धडक बसून दहा लहान मुले मृत्युमुखी पडली. उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात सोमवारी हा भीषण अपघात झाला. व्हॅनमध्ये १६ मुले होती. सहा मुले जखमी असून, त्यांच्यावर वाराणसी येथील दीनदयाल रुग्णालय आणि बीएचयू ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
मृतांत १० मुलांसह व्हॅनचालक हातीम खान याचाही समावेश आहे. अपघातानंतर संतापलेल्या लोकांनी व्हॅन पेटवून दिली. ईशान्य रेल्वेने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, समिती या अपघाताची चौकशी करणार आहे. (वृत्तसंस्था)