शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Video: देव तारी त्याला कोण मारी; अंगावरुन ट्रेन जाऊनही चिमुकली सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 17:13 IST

संपूर्ण ट्रेन अंगावरुन जाऊनही साधं खरचटलंदेखील नाही

मथुरा: उत्तर प्रदेशातल्या मथुरा रेल्वे जंक्शनवर आज एक अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या कुशीतील एक वर्ष वयाची चिमुरडी रेल्वे रुळांजवळ पडली. ट्रेन आणि फलाट यांच्यामध्ये असलेल्या जागेतून ही मुलगी रुळांजवळ पडली होती. तेवढ्यात ट्रेन सुरू झाली. मात्र या मुलीला साधं खरचटलंही नाही. ती अगदी सुरक्षित होती. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार पाहणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मथुरा रेल्वे जंक्शनवर आज सकाळी घडलेल्या घटनेमुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. एका महिला प्रवाशाच्या कुशीत असलेली एक वर्ष वयाची चिमुरडी रुळांजवळ पडली. त्यामुळे अनेकांच्या काळजात काही वेळासाठी धस्स झालं. ट्रेन आणि फलाट यांच्यामध्ये असलेल्या जागेतून ही चिमुरडी रुळांजवळ पडली. तिला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याआधीच ट्रेन सुरू झाली. मात्र देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय यावेळी आला. संपूर्ण ट्रेन अंगावरुन जाऊनही चिमुरडीला साधं खरचटलंही नाही. जवळपास 8 ते 9 फूटांवरुन पडून आणि संपूर्ण ट्रेन अंगावरुन जाऊनही चिमुरडीला इजा झाली नाही. या मुलीचं नाव साहिबा असं आहे. साहिबाचे आई-वडिल तिला घेऊन मथुरा रेल्वे जंक्शनवर आले होते. यावेळी साहिबा तिच्या आईच्या कुशीत होती. मात्र फलाटावरील गर्दी वाढल्यानं धक्काबुक्की झाली आणि साहिबा आईच्या कुशीतून थेट फलाट आणि ट्रेन यांच्यामध्ये असलेल्या जागेतून थेट रुळांजवळ पडली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात ट्रेन सुरू झाल्यानं अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र चिमुरडी सुरक्षित असल्याचं पाहून सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात