रेल्वेगाडीच्या कोचमध्ये शिरले पाणी
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:36+5:302015-01-22T00:07:36+5:30
रेल्वेगाडीच्या कोचमध्ये शिरले पाणी

रेल्वेगाडीच्या कोचमध्ये शिरले पाणी
र ल्वेगाडीच्या कोचमध्ये शिरले पाणीतक्रारीकडे दुर्लक्ष : प्रवाशांनी चेन पुलिंग करून घातला गोंधळनागपूर : गाडीत पाणी भरावयाचा पाईप तुटल्यामुळे पाणी कोचवर उडून खिडकीतून कोचमध्ये आल्यामुळे बिलासपूर-भगत की कोठी समर स्पेशल या गाडीचे एस-२, एस-३ कोच जलमय झाले. प्रवाशांनी तक्रार करूनही कोचमधील पाणी बाहेर न काढता ही गाडी रवाना केल्यामुळे प्रवाशांनी चेन पुलिंग केले. त्यामुळे काही अंतरावर गेलेली ही गाडी पुन्हा रेल्वेस्थानकावर आणण्यात आली. या गोंधळात या गाडीला दोन तासाचा विलंब झाला.रेल्वेगाडी क्रमांक ०८२४३ बिलासपूर-भगत की कोठी समर स्पेशल ही गाडी रात्री १.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. या गाडीत पाणी भरत असताना अचानक पाणी भरण्याचा पाईप तुटला. त्यामुळे पाण्याचा फवारा या गाडीच्या एस-२, एस-३ कोचवर उडाला. कोचवरील पाणी खिडकीतून या दोन्ही कोचमध्ये शिरले. दोन्ही कोचमध्ये राम देवरा यात्रेला जाणारे श्री रामदेव मंदिर समिती सब्जी मंडी गोंदिया येथील २०० भाविक होते. कोचमध्ये पाणी आल्यामुळे हिवाळ्यात आणखी त्रास होईल या भीतीने या भाविकांनी रेल्वे प्रशासनाकडे कोचमधील पाणी बाहेर काढण्याची मागणी केली. परंतु त्यांची मागणी न ऐकताच ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर गेल्यानंतर प्रवाशांनी चेन पुलिंग करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाविकांनी गाडीच्या गार्डसोबत हुज्जत घातली. अखेर ही गाडी पुन्हा परत मागे आणण्यात आली. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून या गाडीच्या कोचची सफाई करण्यात आली. रात्री ३.२० वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. (प्रतिनिधी)...............