शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायच्या नियमावलीला तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३१ मेपर्यंत संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 06:54 IST

३१ डिसेंबरपासून ट्रायच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मुंबई : आवडीच्या वाहिन्या निवडण्यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीला अद्यापही हवातसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जे ग्राहक ३१ मेपर्यंत आवडीच्या वाहिन्यांची निवड करणार नाहीत, त्यांना बेस्ट फिट प्लॅनप्रमाणे टीव्ही पाहावा लागणार आहे. मुंबईत सध्या सुमारे६० टक्के ग्राहकांनीच अर्ज भरले आहेत.

३१ डिसेंबरपासून ट्रायच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याला मुदतवाढ देऊन ही मुदत पहिल्यांदा३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. ग्राहकांचा अल्प प्रतिसाद आणि केबल चालकांसोबतचा तिढा सोडविला न गेल्याने ही मुदत दुसऱ्यांदा वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवण्यात आली असून, ३१ मेपर्यंत नवीन नियमावलीप्रमाणे आवडीच्या वाहिन्यांची यादी करून केबल चालकांना किंवा डीटीएच सेवा पुरवठादारांना देण्याची मुभा देण्यात आली आहे.आधीपेक्षा दर वाढलेनवीन नियमावलीमुळे वाहिन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना मिळेल व पूर्वीच्या तुलनेत कमी रक्कम आकारली जाईल, असा दावा ट्रायने केला होता. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त रक्कम भरावी लागत असल्याने ग्राहकांमधून ट्रायच्या या नियमावलीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाहिन्यांची निवड करण्याची प्रक्रियादेखील क्लिष्ट असून ब्रॉडकास्टर्स व एमएसओनी विविध समूह तयार केले असले तरी एकाच समूहामध्ये आवडीच्या सर्व वाहिन्या मिळत नसल्याने अनेक समूह निवडावे लागत असल्याने टीव्ही पाहण्याचा दर प्रचंड प्रमाणात वाढला आहे.‘ग्राहकांवर अधिभार’च्ग्राहकांच्या हिताचे नाव देऊन तयार करण्यात आलेल्या या नियमांचा फटका ग्राहकांना बसत आहे. ग्राहकांना अधिक रक्कम द्यावी लागत आहे. ट्राय जोपर्यंत केबल चालकांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन नियम बनवणार नाही तोपर्यंत गोंधळ सुरू राहण्याची भीती आहे, असे मत केबल आॅपरेटर अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युटर असोसिएशनच्या कोअर समिती (कोडा)चे सदस्य विनय (राजू) पाटील यांनी व्यक्त केले. कोडाने मागणी केलेल्या ३ महिन्यांच्या मुदतवाढीला ट्रायने मुदतवाढ देऊन आमच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा पाटील यांनी केला.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायTelevisionटेलिव्हिजन