बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पालकांनी किरकोळ कारणावरून ओ संतापलेल्या पाच अल्पवयीन मैत्रिणींनी एकत्र विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या भीषण घटनेत चार मुलींचा जागीच मृत्यू झाला असून, एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. ही घटना २९ जानेवारी रोजी हसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैदपूर मोती बिघा गावात घडली. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारीला सरस्वती पूजेच्या दिवशी या पाचही मैत्रिणी गावातील काही मुलांसोबत फिरत होत्या. हे पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर ओरडले. या अपमानाचा धक्का सहन न झाल्याने पाचही मैत्रिणींनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्या गावाबाहेरील एका तलावाजवळ गेल्या आणि तिथे त्यांनी पक्षी मारण्याचे विषारी औषध प्राशन केले.
या घटनेत वाचलेल्या एकमेव मुलीने अंगावर शहारे आणणारा घटनाक्रम सांगितला. "आम्ही सर्वांनी ते विषारी औषध प्यायले, पण मला त्याची चव विचित्र लागल्याने मी ते लगेच थुंकून दिले. थोड्याच वेळात माझ्या चारही मैत्रिणी माझ्या डोळ्यांसमोर बेशुद्ध पडल्या. मी प्रचंड घाबरले आणि धावत घरी जाऊन पालकांना सर्व सांगितले. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. गरिबी आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने कुटुंबीयांनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता चारही मुलींच्या मृतदेहांवर गावातील स्मशानभूमीत एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
Web Summary : In Bihar, five girls consumed poison after being scolded for socializing with boys. Tragically, four died. One survived and alerted family. Families cremated bodies secretly. Police are investigating.
Web Summary : बिहार में, लड़कों के साथ घूमने पर डांटे जाने के बाद पांच लड़कियों ने जहर खा लिया। दुखद रूप से, चार की मौत हो गई। एक बच गई और परिवार को सतर्क किया। परिवारों ने शवों का गुप्त रूप से अंतिम संस्कार कर दिया। पुलिस जांच कर रही है।