चॅनल गेटमध्ये फसून महिलेचा करुण अंत
By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:37+5:302016-01-30T00:17:37+5:30
नागपूर : नोकरीच्या आशेने मुलाखतीसाठी गेलेल्या सविता विरळ तुरसकर (वय २८, रा. वाडी) या महिलेचा टीसीएस कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक चॅनल गेटमध्ये फसून करुण अंत झाला.

चॅनल गेटमध्ये फसून महिलेचा करुण अंत
न गपूर : नोकरीच्या आशेने मुलाखतीसाठी गेलेल्या सविता विरळ तुरसकर (वय २८, रा. वाडी) या महिलेचा टीसीएस कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक चॅनल गेटमध्ये फसून करुण अंत झाला. पारिवारिक सूत्रांच्या माहितीनुसार सविता मिहान परिसरातील टीसीएस कंपनीत गुरुवारी मुलाखतीसाठी गेली होती. दुपारी १.३० च्या सुमारास ती चॅनल गेटजवळ उभी होती. अचानक स्वयंचलित गेट बंद झाले. त्यात फसल्याने सविता गंभीर जखमी झाली. तिला खामल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सविताचा पती वाडीच्या दाभा चौकात मोबाईल शॉपी चालवतो. तिला एक तीन वर्षांची मुलगी असल्याचे समजते. माहितीवरून सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. दाभा-वाडी परिसरात या घटनेने शोककळा पसरली असून अपघाताला दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.--