शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

जीएसटीविरुद्ध व्यापारी संतप्त, सुरत येथे घेणार बैठक, देशव्यापी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:33 IST

वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) लागू होऊन ७५ दिवस उलटले असतानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी असून, व्यापा-यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : वस्तू आणि सेवा करप्रणाली (जीएसटी) लागू होऊन ७५ दिवस उलटले असतानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी असून, व्यापा-यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.देशभरातील ६ कोटी व्यापा-यांचे प्रतिनिधित्व करणा-या कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या संघटनेचे असे म्हणणे आहे की, जीएसटी व्यापाºयांसाठी दु:स्वप्न ठरत आहे. अनेक शंका निर्माण होत आहेत. जीएसटी व्यापा-यांवर बळजबरीने लादण्यात आला. जीएसटी परिषदेने तर व्यापा-यांशी चर्चा करण्याची तसदीही घेतली नाही. व्यापा-यांवर सातत्याने दबाव वाढत असल्याने कॅटने १८ व १९ सप्टेंबर, अशी दोन दिवस सुरत येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत सद्य:स्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. सोबतच भविष्यतील कृती आणि देशव्यापी आंदोलनाबाबतही चर्चा केली जाणार आहे, असे संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.सुलभ करप्रणालीचा सरकारने वायदा केला होता; परंतु जीएसटी नेटवर्क पोर्टलच्या निराशाजनक कामगिरीने तसेच राज्य सरकारच्या अनास्थेमुळे व्यापा-यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या, असेही त्यांनी म्हटले आहे. जीएसटीएन पोर्टल सपशेल कुचकामी ठरले आहे. परिणामी, व्यापा-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संगणकाविना काम करणा-या ६० टक्के व्यापा-यांसाठी मोठीच डोकेदुखी ठरली. जीएसटीएन प्रणालीबाबत राज्य सरकारने व्यापारी आणि ग्राहकांना जागरूक करण्यासाठी कोणतेही पाऊल उचचले नाही. सरकारला सहकार्य करण्याची व्यापा-यांची तयारी आहे.तिघांशी सामन्याची तयारी ठेवाजीएसटी नेटवर्कमधील तांत्रिक उणिवांमुळे व्यापारी त्रस्त असून, सरकारही हैराण आहे. तांत्रिक पैलूंची पडताळणी आणि त्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी जीएसटी परिषदेने बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीची पहिली बैठक शनिवारी आहे. पोर्टलमधील तांत्रिक उणिवांमुळे सरकारला जीएसटी रिटर्न दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी लागली होती.